गोवा : ओशेल पंचायतीत कोचरेकर दाम्पत्य विजयी | पुढारी

गोवा : ओशेल पंचायतीत कोचरेकर दाम्पत्य विजयी

शिवोली; जयेश नाईक :  ओशेल पंचायतमध्ये कोचरेकर दाम्पत्य निवडून आले. या पंचायतीमध्ये दाम्पत्य निवडून येण्याची परंपरा यंदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाली. माजी उपसरपंच प्रवीण कोचरेकर पुन्हा एकदा निवडून आले आहेत. त्यांच्यासोबतच यांच्या पत्नी प्राप्ती याही निवडून आल्या आहेत.

सात सदस्य पंचायत मंडळात रेशल अर्पोरकर, सिद्धी देवानंद शिरोडकर, वैभव सुमन मयेकर, राजू बाणावलीकर व शर्मिला श्याम चोडणकर निवडून आले आहेत. राजू बाणावलीकर व प्रवीण कोचरेकर हे आतापर्यंत तीन वेळा पंच सदस्यपदी निवडून आलेले आहेत. रेषल अर्पोरकर यांनीही आपली जागा कायम ठेवण्यात यश प्राप्त केले.

राजू बाणवलीकर व सुमन मयेकर हे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचे समर्थक असल्याचे समजते. कोचरेकर गटाला सरपंचपद मिळणार, असा दावा केला जात असला तरी रेषल अर्पोरकर यांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असल्याचे सध्या दिसून येते.

Back to top button