गोवा : पंचायत निवडणुकीसाठी दिवसभरात 1,209 अर्ज | पुढारी

गोवा : पंचायत निवडणुकीसाठी दिवसभरात 1,209 अर्ज

पणजी :  राज्यातील 186 पंचायतीच्या 10 ऑगस्ट रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारी 21 रोजी तब्बल 1,209 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापूर्वीचे अर्ज लक्षात घेता आतापर्यंत 1,492 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 25 जुलै हा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी भरलेल्या अर्जात सवार्ंत जास्त 43 अर्ज बार्देश तालुक्यातून भरण्यात आले.

      निवाडा राखून
दरम्यान, पंचायत निवडणुकांत ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या चार व्यक्तींनी आपल्या पंचायतीच्या प्रभागांच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोेधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने निवाडा राखून ठेवला आहे.

Back to top button