Lok Sabha Elections 2024 : दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज, नेहा शर्मासह अन्य स्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क (Video)

prakash raj
prakash raj

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळुरु दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राजने आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्या उमेदवाराला मत दिलं, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रकाश राज म्हणाले.

भागलपूर : अभिनेत्री नेहा शर्मा वडील अजित शर्मा यांच्यासोबत मतदान करायला गेली. यावेळी ती म्हणाली, "हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी लोकांना विनंती करते की, हा एक अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे जो, आपल्याकडे आहे. एक जागरूक नागरिक म्हणून, बाहेर पडा आणि मतदान करा कारण तुमचे मत अमूल्य आहे…"

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news