गोव्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू | पुढारी

गोव्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात आज (दि. ५) रोजी अनेक दिवसानंतर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज १३०५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचणी अहवालानुसार आज ११२ नवे कोरोना बाधित सापडले तर १९१ कोरोना बाधित बरे होवून घरी परतले आहेत. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८४१ झाली आहे. राज्यात आजच्या दिवशी ८८२ सक्रिय कोरोना बाधित आहेत.

राज्यात मोफत बूस्टर डोस आणि कोरोना नियंत्रण लसीकरण सुरू आहे. सध्या विद्यार्थ्यांना लस देण्यात येत आहे. तसेच साठ वर्षावरील नागरिक आणि फ्रन्टलाइन वर्कसना बूस्टर डोस देण्यात येत आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ६० वर्षावरील ७५,३७० जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. ही टक्केवारी ६०.६१ टक्के आहे. राज्यातील १८ वर्षावरील ११,९९,७९६ लोकांनी कोरोना नियंत्रणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. १८ वर्षावरील लोकांनी लस घेतल्याची टक्केवारी १०२. ९० टक्के आहे. १५ ते १७ वर्षाच्या वयाच्या ६०,३८६ जणांनी ( ८१.६० टक्के ) दोन्ही डोस घेतले आहेत . तर १२ ते १४ वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये २४,५७१ जणांनी (५०.७७ टक्के) जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Back to top button