गोवा : ख्रिस्ती बांधवांचा सांजाव उत्साहात | पुढारी

गोवा : ख्रिस्ती बांधवांचा सांजाव उत्साहात

मडगाव ,पुढारी वृत्तसेवा : ‘सांजाव रे सांजाव.. चल रे..! पी रे..! अशी पारंपरिक गीते गात पावसात अगदी चिंब भिजून, पारंपरिक पद्धतीने विहिरीत उड्या मारून मोठ्या जल्लोषात ख्रिस्ती बांधवांनी गुरुवारी सांजाव साजरा केला.

अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये सांजावचे आयोजन केल्याने पर्यटकांनीही याचा आनंद लुटला.

पावसानेही पारंपरिक नेवरयो, पातोळ्या, सान्ना, धोदोल यासारखे खाद्यपदार्थ लोकांनी घरी बनविले. सासष्टीत मडगाव, कोलवा, बाणावली, केळशी, नुवे, नवेली, कोंबा, मजोरडा, कोलवा येथे ग्रेण्ड वानेली, पिकेन मानली, राय येथे पारंपरिक खेळात सांजाव खुलला.

Back to top button