SBI बँकेचे नवे ॲप; शॉपींग साईटवर भरघोस डिस्काउंट | पुढारी

SBI बँकेचे नवे ॲप; शॉपींग साईटवर भरघोस डिस्काउंट

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

एखाद्या बँकेत अकाऊंट काढल्यानंतर जर तुम्हाला ५ लाख रूपयांचा अपगारी विमा मोफत मिळत आहे असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? पण, होय हे खरे आहे. कोणत्याही सामान्य नाही तर देशातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI YONO (एसबीआय योनो) या नावाचे एक नवे ॲप लॉन्च केले आहे. या ॲपवरून जर तुम्ही नवीन खाते उघडलेत तर तुम्हला ५ लाख रूपयांचा अपघाती विमा मोफत मिळू शकतो. फक्त अपघाती विमाच नाही तर बँकेच्या इतर सुविधाही ग्राहकांना देण्यात येणार आहेत. 

एसबीआयच्या या ॲपद्वारे खाते उघडल्यास ॲमेझॉन आणि ऊबर या कंपन्यांच्या सेवाही मिळणार आहेत. इतर सेवांवर खास ऑफर्स आणि डिसकाउंट्सही देण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा ऐकूण या ॲपचा वापर करून अकाऊंट उघडावे असे तुम्हालाही वाटले असेल ना, चला तर मग जाणून घेऊयात कसे सुरू करायचे हे नवे खाते….

अकाऊंट सुरू करण्याच्या अटी व नियम 

हे अकाऊंट १८ वर्षे पूर्ण असलेल्या ग्राहकालाच उघडता येणार आहे

अकाऊंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची गरज आहे.  मोबाईल आणि ईमेल वापरून एकच अकाऊंट सुरू करता येणार आहे. 

SBI YONO (You Only Need One) अकाऊंट सुरू करण्यासाठी आधार आणि पॅनकार्डची आवश्यकता आहे. 

अकाऊंट सुरू केल्यानंतर फक्त एकच युजर त्याचा वापर करू शकतो. तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेत जाऊन तुम्ही या ॲपवरील अकाऊंटला जॉईंट अकाऊंटमध्येही मर्ज करू येते. 

यासाठी ॲपवरील अकाऊंट रेग्युलर सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये बदलण्याची गरज आहे.

या अकाऊंटमध्ये नॉमिनीचे नावही द्यावे लागेल. 

ॲपवर सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या एसबीआय ब्रँचची निवड करता येते. ज्या ब्रॅन्चची निवड तुम्ही करता ती तुमची होम ब्रॅन्च बनते.   

आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला नजिकच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये जावे लागेल. 

कोणकोणत्या सुविधा मिळणार ? 

५ लाख रूपयांचा अपघाती विमा

अकाऊंट उघडल्यांतर तुम्हाला स्पेशल प्लॅटिनम डेबिट कार्ड देण्यात येते

डेबिट कार्डसाठी वर्षाला २०० इतके रूपये द्यावे लागतील. तर तुम्ही २५ हजार रूपयांचे तिमाही रक्कम ठेवली तर मेंटनन्स फी द्यावी लागणार नाही. 

प्लॅटिनम डेबिट कार्डवरून तुम्हाला १ हजार रूपये काढता येऊ शकतात. 

या अकाऊंटवरून एकही चेकबुक मोफत मिळणार नाही. असे असले तरी तुम्ही कमीत कमी १० चेकबुक मागवू शकता. प्रत्येक चेकबुकसाठी १० रूपये द्यावे लागतील. 

कर्ज आणि शॉपींग सुविधा

एसबीआय लाइफ, एसबीआय जनरल, एसबीआय म्युच्यूअल फंड, एसबीआय कॅप्स आणि एसबीआय कार्ड्स यांसारख्या सुविधा ही खातेधारकाला देण्यात येणार आहेत. 

या ॲपद्वारे तुम्ही गृह आणि ऑटोसाठी कर्ज घेऊ शकता. 

लाइफस्टाइल सेगमेंटच्या १४ कॅटगिरीजमध्ये शॉपिंगची सुविधाही या ॲपमध्ये मिळणार आहे. 

बँकेने ६० ई-कॉमर्स  कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. या कंपन्यांच्या उत्पादनांची खरेदी केल्यास तुम्हाला खास ऑफर्स आणि डिस्काऊंटही मिळतील.  

या कंपन्यांमध्ये ॲमेझॉन, ऊबर, ओला, मिंट्रा, जबॉन्ग, शॉपर्स स्टॉप, कॉक्स ॲण्ड किंग्स, थॉमस कुक, एअरबीएनबी, स्विगी आणि बायजू यांसारख्या शॉपिंग कंपन्यांच्या सेवा घेतल्यास युजरला डिस्काऊंटही मिळणार आहे. 

असे सुरू करा ॲप अकाऊंट 

गुगल ॲपमध्ये YONO टाईप करा. YONO By SBI ॲप इन्स्टॉल करा. तुम्ही येथे ॲप इन्स्टॉल करू शकता. 

ॲपवर लाग इन केल्यानंतर ‘Open New Digital Account’ वर क्लिक करून डिजीटल सेव्हिंग्स अकाऊंट वर क्लिक करा

यानंतर Apply Now वर क्लिक करा. यानंतर Next वर क्लिक करा.

यानंतर पॅन आणि आधार कार्ड डिटेल भरून पुढील पेजवर जा. या पेजवर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचे तपसील भरावे लागतील. 

प्रायवेस पॉलिसी वाचून तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा. 

कैसे खोलें अकाउंट?


Tags : SBI,YONO Account, Facilities, Bank,  National Bank, Apps, 

Back to top button