Mahabaleshwar Explore : महाबळेश्वरला जाताना ‘ही’ ठिकाणेही नक्की पाहा! | पुढारी

Mahabaleshwar Explore : महाबळेश्वरला जाताना 'ही' ठिकाणेही नक्की पाहा!

स्वालिया शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – भिलार (ता. महाबळेश्वर) हे केवळ स्ट्रॉबेरीचे गाव म्हणूनचं नाही तर पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी सोलो ट्रीप किंवा फॅमिलसहित जाता येईल. खरंतर बच्चे कंपनीला भिलार हे गाव नक्की दाखवा. भिलार हे निसर्गसंपन्न गाव आहे. भिलार गावातील प्रत्येक घरात काही ना काही साहित्य हे तुम्हाला पाहायला मिळणारचं. शिवाय येथून काही अंतरावर लिंगमळा धबधबा आहे, जिथे तुम्ही पावसाळ्यामध्ये भेट देऊ शकता. महाबळेश्वरला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट दिला तर तो तुम्हाला धुक्याच्या चादरीमध्ये लपटलेला दिसेल. वाई, धोम धरण, ठोसेघर धबधबा पाहत वृक्षराजींनी वेढलेला निसर्ग, पसरणी घाट ओलांडून हलक्या हलक्या सरी झेलत महाबळेश्वरची सैर करणं, स्वर्गाहून कमी सुख नाही. (Mahabaleshwar Explore) हिरव्यागार वेढलेल्या धरतीवर दाडून आलेले काळे मेघ अन्‌ रिमझिम पाऊसधारा, ओलेचिंब झाडे, अंगावर शहारे आणणारा गारवा असा सुंदर प्रवास तुम्हाला याठिकाणी अनुभवता येईल. (Mahabaleshwar Explore)

पाचगणीपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर पाचगणी ते महाबळेश्वर अंतरावर भिलार हे गाव आहे. गाव तसं सुंदर. अनेक माहिती फलकांना आणि सुंदर चित्रांनी रेखाटलेल्या घरांच्या भिंती तुमचे स्वागत करतात. जाता जाता स्ट्रॉबेरी शेती आणि रंगबेरंगी फुलांची झाडे पटकन लक्ष वेधून घेतात.

शहरातील इमारतींप्रमाणे येथील सुंदर इमारती दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात.

घरांचे ग्रंथालय

भिलारमध्ये पुस्तकांचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र सरकारने साकारली आहे.

लोकसाहित्य, कथा, क्रीडा व विविध लोकप्रिय, कविता, कादंबरी, ग्रामीण कथा, चरित्रे, आत्मचरित्रे, निसर्ग, पर्यावरण, भटकंती, बोलकी पुस्तके व प्रकल्प कार्यालय, महाराष्ट्र प्रदेश, मराठी व संस्कृती, विज्ञान, परिवर्तन चळवळ, समाजसुधारक व सुधारणांचा इतिहास, ललित गद्य आणि वैचारिक पुस्तके, बालसाहित्य, दिवाळी अंक, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तके, स्पर्धा परीक्षा, नियतकालिके व साहित्यिक माहितीफलक, इतिहास, विनोदी, छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, वर्तमानपत्रे व साप्ताहिके, स्त्री साहित्य, संत साहित्य, विविध कलांविषयक, साहित्यिक माहितीफलक.

घरामंधील ग्रंथालये

ही वरील सर्व साहित्य तुम्हाला भिलारमधील नागरिकांच्या घरांमध्ये अगदी मोफत वाचायला मिळते. घरांच्या पहिल्या खोलीत अनेक साहित्य संपदा, पुस्तके पर्यटकांना अगदी मोफत वाचण्यासाठी ठेवलेली आहेत.

तुम्ही याठिकाणी बसून तुम्हाला हवी ती पुस्तके वाचू शकता. १५ ते १७ हजारांच्या जवळपास विविध साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे.

घराच्या भिंतीवर रेखाटलेले चित्र

प्रत्येक घरात ३०० ते ४०० पुस्तके पाहायला मिळतील. कोणीही वाचक तिथे गेला की हवं ते पुस्तक घेऊन वाचू शकतो. वाचायला बसण्यासाठी काही खास जागा तयार केल्या आहेत. समोर पाचगणीचा टेबललँड निदर्शनास पडतो. (Mahabaleshwar Explore)

रस्त्याच्या बाजूला असे छोटे-छोटे धबधबे पाहावयास मिळतात

आणखी कुठे भेट द्याल?

मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी शेती, धुक्यात हरवलेले महाबळेश्वर-पाचगणी, लिंगमळा धबधबा, ठोसेघर धबधबा, सह्याद्रीच्या डोंगरातील भिलार धबधबा.

काय खाल?

स्ट्रॉबेरी, लोणी डोसा, लिची, पेरू, सर्व मोसमी फळे, शाकाहारी, मांसाहारी जेवण.

भिलार येथे कसे जाल?

कोल्हापूर-सातारा (बेंगळुरु – पुणे महामार्गावरील) पाचवड फाटा-वाई-पाचगणी-भोसे खिंड-भिलार
मुंबई पुणे (पुणे – बेंगळुरु महामार्गावरील) सुरुर फाटा-वाई-पाचगणी- भोसे खिंड- भिलार
मुंबई (मुंबई-गोवा महामार्गावरील) पोलादपूर-महाबळेश्वर-भोसे खिंड- भिलार

लिंगमळा धबधबा –

महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून लिंगमळा यास ओळखले जाते. महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधब्याला एकदा का होईना, भेट द्याच! वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा परिसर उत्तम आहे. अनेक पर्यटक खास लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी दूरवरून येत असतात.

लिंगमळा धबधबा

या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहणे, आवाज करत कोसळणारा फेसाळलेला लिंगमळापर्यंत जाण्यासाठी थोडे चालत जावे लागते. लिंगमळा धबधबाला जाण्यासाठी जंगलातून टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्या घेऊन जाता येतं.

लिंगमळाकडे जाणारी वाट

पार्किंग करून तेथून एक ते दीड किलोमीटर पायऱ्या उतराव्या लागतात. हा परिसर जंगलाचा असून धबधब्याच्य़ा कडेने संरक्षक कठडे उभारलेले आहेत. पायऱ्यांवरून सहजरित्या तुम्ही धबधबापर्यंत पोहोचू शकता. याठिकाणी जाणयासाठी किरकोळ प्रवेश शुल्क आकारले जाते. (Mahabaleshwar Explore)

छोटे-छोटे धबघबे लक्ष वेधून घेतात

महाबळेश्वर

थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ख्याती आहे. येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक अक्षरश: मांडी घालून बसतात. गरमागरम भजी, चहा. मक्याचे कणीस अशा पदार्थांचा आस्वाद घेत मनमोहक रांगा, सूर्याचे दर्शन, घोडेस्वारी, अनेक बगीचे, हिरव्यागार निसर्गाचा सैरसपाटा म्हणजे क्या बात है!

दूरवरून दिसणारे लिंगमळा धबधब्याचे विहंगम दृश्य

महाबळेश्वरला का पाहाल?

आर्थर सीट पॉईंट, इको पॉईटं, वेण्णा लेक (बोट रायडिंगसाठी प्रसिद्ध), बॉम्बे पॉईटं, फॉकलँड पॉईंट, महाबळेश्वर मार्केट.

पाचगणीचा परिसर

महाबळेश्वरमध्ये काय खाल?

चहा-कॉफी, मसाले दूध, गरम भजी, मक्याचे कणीस. मध, जाम, जेली, रासबेरी, स्ट्रॉबेरी, अनेय इतर खाद्यपदार्थ.

महाबळेश्वर येथे घोडेस्वारी करता येईल

श्री क्षेत्र महाबळेश्वर

महाबळेश्वर येथून ५ किमी अंतरावर श्री क्षेत्र महाबळेश्वर आहे. येथे जुने कृष्णाबाई मंदिर आहे. शिवाय अनेक धार्मिक स्थळे याठिकाणी पाहता येईल.

महाबळेश्वर येथे घोडेस्वारी करता येईल

महाबळेश्वरला कसे जाल?

पुणे पासून १२१ किमी
मुंबईपासून २७१ किमी
सातारा शहरापासून ५६ किमी
कोल्हापूरपासून १७८ किमी

हेदेखील वाचा  – 

गार्डन

लिंगमळा धबधब्याकडे जाणारी पायऱ्यांची वाट
मार्केटमध्ये विक्रीस ठेवलेल्या मातीच्या सुंदर वस्तू

तलावातील कमळ
लिंगमळा धबधबा

 

मार्केटमध्ये विक्रीस ठेवलेल्या मातीच्या सुंदर वस्तू

 

Back to top button