युट्यूबने लहान व्हिडिओ करण्यासाठी आणली भन्नाट आयडिया; वेगळ्या ॲपची गरज नाही! | पुढारी

युट्यूबने लहान व्हिडिओ करण्यासाठी आणली भन्नाट आयडिया; वेगळ्या ॲपची गरज नाही!

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आत्तापर्यंत ११८ ॲप्सवर बंदी घातली. यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेले ॲप म्हणजे टीकटॉक. टिकटॉक या ॲपवर बंदी घातल्यानंतर नेटकऱ्यांसाठी इन्स्टाग्रामने इन्स्टा रील्स हे शॉर्ट्स व्हिडिओचे ॲप लाँच केले. दरम्यान, जगातील सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या युट्यूबने शॉर्ट्स बनविणार्‍या प्लॅटफॉर्मला आता टक्कर देण्याचे ठरवले. 

टिकटॉकला बंदी घातल्यापासून फेसबुक, इन्स्टाअसे कित्येक अ‍ॅप्स या स्पेसमध्ये आले आहे आणि आता यूट्यूबने टिकटॉकसारख्या शॉर्ट व्हिडिओ फीचर शॉर्ट्सची घोषणा केली आहे. 

काय आहे युट्यूब शॉर्ट्स

►युट्यूब शॉर्ट्स हे युट्यूबच्या मुख्य ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे दुसरे नवे कोणते ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही.

 ►पर्यायांप्रमाणे लाइक, कमेंट आणि शेअर्स दिले आहेत.

►व्हिडिओ शॉर्ट्सवर दोन प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आपण १५ सेकंदांचे लहान व्हिडिओ बनवू शकता. तथापि, आपण प्रत्येकी १५ सेकंदात अनेक  व्हिडिओ देखील मिसळू शकता. 

►जर तुमच्याकडे शॉर्ट्स कॅमेऱ्याची सुविधा मिळाली नाही तर व्हिडिओ अपलोड करतेवेळी टायटल आणि  डिस्क्रिप्शनमध्ये #Shorts असे लिहावे लागेल. त्यांनतर काही कालांतराने तुम्हाला  शॉर्ट्स कॅमेऱ्याची सुविधा मिळू शकते.

►शॉर्ट्स व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी, युजर्सना काउंटडाउन टाइमर दिसेल. येथून रेकॉर्डिंगचा वेग नियंत्रित केला जाऊ शकतो आणि क्रिएटिव्ह देखील केली जाऊ शकते.

भारतात टीकटॉकवर बंदी घातल्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओसाठी अनेक प्लॅटफॉर्म लॉन्च झाले होते. यामध्ये इन्स्टरील्स हे सर्वात लोकप्रिय ठरले होते. मात्र, आता युट्यूबने शॉर्ट्स व्हिडिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये पाऊल टाकले आहे. त्यामुळे सर्वात लोकप्रिय कोणते ॲप ठरले हे पाहणे उत्सुकत्याचे ठरेल. 

Back to top button