Eye Make Up Tips : ‘इन आँखो की मस्ती के…’ असे सजवा डोळ्यांना | पुढारी

Eye Make Up Tips : 'इन आँखो की मस्ती के...' असे सजवा डोळ्यांना

पुढारी कस्तुरी – Eye Make Up Tips : आतापर्यंत डोळ्यांवर सुंदर सुंदर गाणी, उपमा अलंकारांच्या वर्णनाचा वर्षाव केला असल्याचे आपण ऐकले आहे. हिंदी किंवा मराठी चित्रपटांतील नायिकेच्या डोळ्यांवर कॅमेरा आणि त्या सुंदर डोळ्यांना कवितेत किंवा गाण्यांमध्ये बद्ध करून टाकलेले दिसून येते. इतकी महती डोळ्यांच्या सुंदरतेची आहे. डोळ्यांना सजवण्यासाठी खालील बाबींचा वापर करा.

चेहर्‍याचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे डोळे. उन्हाळ्यात वॉटरप्रूफ कॉस्मेटिक्सचा वापर करावा आणि डोळ्यांचा मेकअप करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.

Eye Make Up Tips : आय शॅडो

संबंधित बातम्या

डोळ्यांचा मेकअप करताना ब्राऊन कलरच्या आय शॅडोने डोळ्यांना डीप सेट करावे आणि तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग शेड पापण्यांवर लावावे. आयब्रोजच्या खाली ब्राईड क्रिमी, गोल्डन किंवा सिल्व्हर कलरने हायलाईट करू शकता.

आय लायनर

उन्हाळ्यात आय लाईनर वॉटरप्रूफ असायला पाहिजे. तुम्ही वाटल्यास डोळ्यांच्या खाली पेन्सिल किंवा लाईनरचा वापर करू शकता. आय लाईनर आपल्या स्कीन टोन आणि ड्रेसच्या अनुरूप ब्राऊन किंवा निेळ्या रंगाचे असू शकतात. हे रंग उठून दिसतात आणि ड्राय लूक पण देतात.

Eye Make Up Tips : मस्कारा

उन्हाळ्यात मस्कारासुद्धा वाटरप्रूफ असायला पाहिजे. आपल्या आवडीनुसार ब्राऊन किंवा निळ्या रंगाचा मस्कारा लावू शकता. तुम्ही पापण्यांवर ट्रास्परंट मसकारा लावून आवडीनुसार शेप देऊ शकता.

आयब्रोज

आपल्या आयब्रोजला सुंदर शेप देण्यासाठी आणि तनया ठिकाणी कट किंवा रिकामी जागा भरण्यासाठी ब्राऊन आणि ब्लॅक पेन्सिलचा वापर करावा.

सौंदर्य, फॅशन व्यतिरिक्त, हर्षदा विजयला ‘या’ क्षेत्राची आवड

Fashion Today : साड्यांवर कोणता ब्लाऊज घालावा? ‘हा’ आहे लेटेस्ट फॅशन ट्रेंड

Back to top button