Fashion Today : साड्यांवर कोणता ब्लाऊज घालावा? ‘हा’ आहे लेटेस्ट फॅशन ट्रेंड | पुढारी

Fashion Today : साड्यांवर कोणता ब्लाऊज घालावा? 'हा' आहे लेटेस्ट फॅशन ट्रेंड

पुढारी ऑनलाइन डेस्क : Fashion Today : पूर्वीच्या काळी कुठल्याही साडीवर काळे, पांढरे, तांबडे अशा ठरावीक रंगाचेच ब्लाऊज घातले जायचे किंवा फार तर खणाचे ब्लाऊज वापरले जायचे. आता काळ बदलला आहे. फॅशनच्या जगतात विविध प्रकारे सजवलेल्या ब्लाऊजची फॅशन चांगलीच रूळली आहे. बाजारात सध्या रेडिमेड ब्लाऊजला भरपूर मागणी असल्याचे दिसून येते. होजीअरी, लिअग्रा यासारख्या फॅब्रिकमध्ये उत्तम फिटिंगचे ब्लाऊज सामान्य किमतीत मिळतात. यामध्ये कॉन्ट्रास्ट किंवा मिक्स अँड मॅचचा चांगला पर्यायदेखील उपलब्ध असल्याने असे ब्लाऊज महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

Fashion Today : रेडिमेड ब्लाऊज खरेदी करताना

ब्लाऊज खरेदी करताना त्याची रंगसंगती ही विरुद्ध असावी. मिक्स अँड मॅचचा आणखी एक फायदा म्हणजे एकच ब्लाऊज दोन-तीन साड्यांवर घालता येतो. एका साडीवर मॅचिंग असणारे ब्लाऊज दुसरीवर क्लोज कॉन्ट्रास्ट आणि तिसरीवर आऊटराईट कॉन्ट्रास्ट ठरते. अलीकडे ब्लाऊजच्या नेकलाईनमध्ये हायनेकपासून डिप लो कटस्पर्यंत अनेक प्रकार बघायला मिळतात. हे सर्व प्रकार एकदा बघून मग ब्लाऊजची निवड करावी. बाह्यांमध्येदेखील स्लीवलेस, मेगास्लीव्ज रेग्युलर स्लीव्ज, थ्रीफोर्थ, फुली स्लीव्ज, स्पॅगेटी टाईप, हॉल्टरनेट असे किती तरी पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी आपल्याला शोभतील आणि वेळप्रसंगाचे भान राखून ब्लाऊजची निवड करावी.

फिटिंगच्या पॅटर्नमध्येही बरेच पर्याय दिसतात. कटोरी किंवा साधे ब्लाऊज हे तर पारंपरिक पर्याय आहेत. त्याचबरोबर प्रिंसेस कट, चोलीसारख्या स्टाईलदेखील चांगल्या चलतीत आहेत. अर्थात, हे प्रकार लग्न समारंभ, पार्टी यासाठीच चांगले दिसतात. दैनंदिन वापरासाठी मात्र सौम्य डिझाईनचे ब्लाऊजच चांगले दिसतात. ऑफिसमध्ये जाताना तर ब्लाऊज थोेडे रुंद आणि साधेच योग्य ठरते. विरुद्ध रंगाची संगती चालू शकते; पण त्यावर फार वर्क नसावे. अशा प्रकारे तयार ब्लाऊजचा पर्यायदेखील थोड्या
विचारपूर्वक पद्धतीनेच निवडणे योग्य ठरते. Fashion Today

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button