लग्नाची साडी निवडताय? | पुढारी

लग्नाची साडी निवडताय?

मृणाल सावंत : विवाह हा प्रत्येकीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण. साहजिकच अशा संस्मरणीय समारंभासाठी तयार होताना प्रत्येक तरुणी दक्ष असते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची असते ती लग्नाची साडी. तिची निवड ही फारच गोंधळवून टाकणारी असते. एकदा लग्नाची तारीख ठरल्यानंतर लग्नाच्या साडीबाबत अनेक सूचना आणि सल्ले न मागताच दिले जातात. त्यामुळे ही साडी निवडू की ती अशी मनाची स्थिती होते; पण त्यातून योग्य निवड करताना साड्यांचे प्रकारही माहीत असणे आवश्यक आहे.

लग्नातील साडी नजरेत भरणारी असलीच पाहिजे. यासाठी भागलपुरी सिल्क साडी उत्तम ठरेल. जर्दोसी ही भारतातील पारंपरिक हस्तकला आहे. या साडीमुळे उच्च लूक मिळण्यास मदत होते. जर्दोसी करताना भारतीय आणि पाश्चिमात्य असे दोन्हींचे मिश्रण केले जात असल्याने ती अधिक उठावदार दिसते.

सध्या लेहंगा साडी ही लग्नामध्ये चांगलीच पसंती मिळवताना दिसतेय. कळ्यांचा लेहंगा, फिश कट किंवा स्ट्रेट फिट लेहंगा घातल्यास नववधू नक्कीच भाव खाऊन जाते. अनेकदा लग्नातील हेवी साड्या किंवा पोशाख परत परत वापरले जात नाहीत. लेहंगा साडी पुढेही व्यवस्थित वापरता येते.

संबंधित बातम्या

हाफ सारीजचाही सध्या ट्रेंड आहे. यामध्ये साडीचा पदर हा खूप महत्त्वाचा असतो. पदरावर अत्यंत सुरेख आणि आखीवरेखीव काम केलेले असते. त्यामुळे या साडीला खूप अधिक मागणी आहे. हाफ साडीमुळे नववधूला स्वर्गीय सौंदर्य लूक प्राप्त होऊ शकतो. विवाहासाठी बॉलीवूड साडीचाही पर्याय उत्तम ठरतो. काही विशिष्ट हेतूने केलेले आरेखन आणि दोर्‍याच्या हस्तकलेचे उत्कृष्ट काम हे या साड्यांचे वैशिष्ट्य आहे.

या साडीमुळे आपल्याभोवती एक विशेष वलय निर्माण होते. तसेच त्यातून भारतीय संस्कृतीचेही दर्शन होते. हल्ली नववधू क्रेपच्या साडीला महत्त्व देताना दिसतात. या साड्या वजनाला हलक्या असतात आणि नेसण्यास, वावरण्यास सोप्या असतात. त्यामुळे क्रेप साडीचा पर्यायही निवडता येईल. (पेहेराव )

हेही वाचा : 

Back to top button