अन्‍नपूर्णा : चिकन सागवाला | पुढारी | पुढारी

अन्‍नपूर्णा : चिकन सागवाला | पुढारी

पालक  आणि चिकन हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे.  ग्रीन चिकन करतानासुद्धा त्यात पालक वापरला जातो. जसे या आधी सांगितल्याप्रमाणे नॉनव्हेज पदार्थांसोबत पालेभाज्या खाणे खूपच चांगले आहे. या डिशमध्ये हिरवी मिरची पेस्ट आणि लाल मिरची पावडर दोन्ही वापरत असल्यामुळे याची चव आणि रंग खूपच छान होते.

साहित्य : चिकनचे लहान आकाराचे तुकडे अर्धा किलो, पालक प्युरी अर्धी वाटी, आलं लसूण पेस्ट दोन चमचे, हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे, लाल मिरची पावडर एक चमचा, धने पावडर एक चमचा, जिरे पावडर एक चमचा, गरम मसाला पावडर एक चमचा, बारीक चिरलेला कांदा एक, सायीचे दही मोठे चार चमचे, मीठ चवीनुसार तेल अर्धी वाटी, काजू भिजवून त्यांची केलेली पेस्ट दोन चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो एक,  कसुुरी मेथी अर्धा चमचा.

कृती : कुकरमध्ये तेल तापवा त्यात चिकनचे तुकडे चांगले लालसर होईपर्यंत परतवून घ्या. नंतर बाजूला काढून ठेवा. राहिलेल्या तेलात कांदा परतून घ्या. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घाला, टोमॅटो घालून छान परतून घ्या. पालकची प्युरी घालून परत चांगले परतून घ्या. गरम मसाला पावडर, धने-जिरे पावडर, मिरची पावडर, दही घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. काजूची पेस्ट, मीठ घाला. चिकनचे पीस घालून कसुुरी मेथी घाला. गरजेनुसार गरम पाणी घाला. कोथिंबीर घाला. कुकर बंद करून तीन शिट्ट्या घ्या. नंतर बाऊलमध्ये काढून तळलेले काजू आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरम पराठे, जिरा राईस यासोबत छान लागते.

संबंधित बातम्या

Back to top button