Special Aloo Paratha Recipe : ही खास आलू पराठ्याची रेसिपी तुम्ही करून पाहिली का? | पुढारी

Special Aloo Paratha Recipe : ही खास आलू पराठ्याची रेसिपी तुम्ही करून पाहिली का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पराठा म्हटलं की नेहमी आपण घरामध्ये पीठ मळून त्यामध्ये बटाटा घालून पराठे लाटून घेतो. (Special Aloo Paratha Recipe) पण, लिक्विड आलू पराठ्याची रेसिपी एकदम हटके आहे. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. (Special Aloo Paratha Recipe)

साहित्य –

उकडलेले बटाटे

कोथिंबीरी

चिरलेला कांदा

हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स

कोथिंबीर

गरम मसाला

हळद

तिखट (आवडीनुसार)

मीठ

तेल

पाणी

गव्हाचे पीठ किंवा मैदा

कृती-

बटाटे उकडून घ्यावे. खिसणीवर किसून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. वरून बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या किंवा चिली फ्लेक्स घालावे. चवीनुसार मीठ, हिरवी कोथिंबीर, हळद थोडी घालावी. सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावेत. आता गव्हाचे पीठ किंवा मैदा घेऊन त्यात पाणी घालावे. थोडे पातळ होईल पीठ, इतके पाणी घालावे. कारण, पराठा पोळपाटावर लाटून घ्यायचा नाही तर पातळ मिश्रण तयार करून डोसा बनवतो, त्याप्रमाणे रेसिपी करायची आहे. पातळ झालेल्या पीठामध्ये बटाट्याचे मिश्रण टाका. आता एका चमच्याने मिश्रण चांगले फेटून घ्या. जर पीठ खूप घट्ट झाले असेल तर त्यात थोडे पीणी घालू शकता. वरून अर्धा चमचा मोहरीचे तेल टाकावे.

पॅन किंवा तवा घेऊन गॅसवर गरम करायला ठेवावे. पॅनला तेल लावू घ्यावे. डोसा करतो त्याप्रमाणे पळीमध्ये मिश्रण घेऊन पॅनमध्ये पसरावे. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. गरमा गरम आलू पराठे, सॉस, टोमॅटो चटणी किंवा दहीसोबत खायला तयार आहेत.

Back to top button