Healthy Food For Child : मुलांनी खाऊ मागितला तर करून द्या 'ही' हेल्दी फूड रेसिपी | पुढारी

Healthy Food For Child : मुलांनी खाऊ मागितला तर करून द्या 'ही' हेल्दी फूड रेसिपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुले सारखे काही ना काही तरी खाऊ मागत असतात. मग, सारखे चॉकलेट्स, बिस्किटे, वेफर्स आणि गोड खाण्यावर भर दिला जातो. आता तर मुलांना शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. त्यामुळे मुले दिवसभर काही ना काही तरी खाऊ मागत असतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी हेल्दी फूड रेसिपी बनवून देऊ शकता. (Healthy Food For Child) जी बनवण्यास सहज, सोपी आणि चवदार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी अगदी कमी वेळेत होते. मुलांसोबत तुम्ही सकाळी चहासोबतही खाऊ शकता. घरातल्या मंडळींना नाश्तालाही देऊ शकता. (Healthy Food For Child)

साहित्य-

गव्हाची पीठ/ आटा

वाळलेले खोबरे (बारीक खिसून) – १ वाटी

भाजलेले तीळ – २ चमचे

साखर – २ चमचे

तूप

मीठ

फुटाण्याची डाळ

बडीशेप –

पाणी

तेल

कृती –

चपाती करण्यासाठी जसे पीठ मळून घेता तसे चवीपुरता मीठ, पाणी घेऊन मऊसर पीठ मळून ठेवा. पीठ आणखी मऊ होण्यासाठी मळताना पीठामध्ये गरम पाणी घातले तरी चालेल. पीठ १५ मिनिटे मळून तेलाचा हात लावून बाजूला ठेवून द्या.

आता वाळलेले खोबरे घेऊन खिसणीवर बारीक खिसून घ्या. तीळ घेऊन ते चांगले भाजून घ्या. तीळ थंड होऊ द्या. आता एका मोठा वाटीत खिसलेले खोबरे, भाजलेले तीळ आणि जितके गोडे हवे आहे, तितकी साखर मिसळून एकत्र करा.

आपण चपाती लाटून घेतो तसे गोल पण लहान चपाती लाटून घ्या. त्यावर तूप लावून घ्या. त्यावर खोबरे, तीळ आणि साखरेचे मिश्रण हवे तेवढे टाकून घ्या. मुलांना आवडत असेल तर चेरी, फुटाण्याची डाळ आणि बडीशेप घाला. मुले आवडीने खातील.

Back to top button