Karnataki Bendur Special Food : खुसखुशीत कडबू कसे बनवावेत?

kadabu
kadabu

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. मुलांना काहीतरी टेस्टी खायला नेहमीच आवडतं. (Karnataki Bendur Special Food) मग मुलांसाठी गोडधोड पदार्थ बनवा. कडबू रेसिपी हा खास गोड पदार्थ मुलांसोबत घरातल्या मंडळींनाही नक्कीच आवडेल. हा पदार्थ करायला खूप सोपा आणि दोन-तीन दिवस तरी नक्की टिकतात. (Karnataki Bendur Special Food)

file photo
file photo

कडबू बनवण्यासाठी : साहित्य –

गव्हाचे पीठ – १ कप
तेल – ३ चमचे
मीठ – चिमूटभर
भाजलेली खसखस – ३ चमचे
तीळ -१ चमचा
हरभऱ्याची डाळ – ३ किंवा ४ कप
गूळ – १ कप
कच्चे खोबरे मिक्सर वाटलेले – १/४ कप
काजू तुकडे – २ टेबलस्पून
वेलदोडे – ७ ते ७
तूप -४ चमचे
तेल तळण्यासाठी

कृती-

हरभरा डाळ आणि आणि गुळापासून बनवलेल्या करंजींना कडबू असेही म्हमतात. याची चव पुरणपोळीसारखी लागते. खायला टेस्टी लागतात.

कडबू बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ, गरम तेल आणि मीठ, पाणी एकत्र करून मऊसर मळून घ्या. पीठ थोडेसे घट्ट मळून घ्या. १० मिनिटे भिजवून बाजूला ठेवून द्या. नंतर हरभरा डाळ घेऊन स्वच्छ धुवा. कुकर घेऊन त्यामध्ये एक तांब्या पाणी ओतून त्यात डाळ घाला. तीन शिट्ट्या दिल्यानंतर डाळ पूर्णपणे शिजले की नाही पहा. डाळीवर राहिलेलं पाणी बाजूला काढा.

आता शिजलेल्या डाळीत गूळ आणि खोवलेलं खोबरं मिक्स करून घ्या. गॅस बारीक ठेवून ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. मधे मधे हलवत राहा नाही तर गूळ खोबरे भांड्याला चिकटते. हे सारण गार होऊ द्या. नंतर त्यामद्ये काजू, वेलची पूड, खसखस (भाजून) मिसळून घ्या. हे सारण पुन्हा हलवून घ्या.

आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याची मध्यम पुरी लाटून घ्या. पुरी लाटताना त्यात तीळ घालून लाटटले तरी चालेल. आता पुरीमध्ये दिड चमचा सारण घालून पुरी दुमडा. पुरीचे सगळीकडे चांगल्या पद्धतीने चिटकवून घ्या. यासाठी तुम्ही पाणी अथवा दुधाने देखील चिटकवू शकता. असे कडबू तयार करून तळायला घ्या. तेल चांगल्या पद्धतीने गरम होऊ द्या. त्यात कडबू सोडून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
गरम गरम कडबू बाहेर काढून ग्या. त्यावर तुम्ही तूपदेखील टाकून खाऊ शकता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news