महा. राज्य प्राथ. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाचे विविध मागण्यांचे निवेदन | पुढारी

महा. राज्य प्राथ. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाचे विविध मागण्यांचे निवेदन

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची बैठकीत आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदली बाबत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी आमदार रोहित पवार यांच्यासमवेत शिक्षक नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, बाळासाहेब झावरे, आबासाहेब जगताप, राज्य संपर्क प्रमुख एस व्ही पाटील, राजेश वाघमारे, मनोज मोरे,जिवनराव वडजे, मिलिंद गांगुर्डे,दत्तात्रय पवार,विशाल खरमोडे,किशोर पवार, रामदास आव्हाड, रविंद्र घरत, प्रकाश मसले, संदीप मोरे उपस्थित होते.

बैठकीत संभाजीराव थोरात व बाळकृष्ण तांबारे यांनी आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदलीबाबत अभ्यासपूर्ण मुद्दे विशद केले.

आंतरजिल्हा बदलीतील मुद्दे – 

१] शून्यबिंदु नामावली ग्रहीत धरुन आंतरजिल्हा बदली कराव्यात.

२] १० टक्के रिक्तपदाची अट न ठेवता आंतरजिल्हा बदल्याकरुन त्वरीत शिक्षक भरती प्रक्रिया राबवून रिक्त पदे भरावीत.

३] आंतरजिल्हा बदली साठी शिक्षकांना पूर्वी दिलेल्या NOC चा विचार करुन त्यांना प्राधान्य क्रम द्यावा.

४]  आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी.

वरील सर्व बाबीस अभ्यास गटाने मान्यता दिली.

जिल्हांतर्गत बदलीतील मुद्दे – 

१]  बदल्याची टक्केवारी असावी.

२]सेवाजेष्टतेनुसार बदल्या कराव्यात

३] बदलीसाठी ३० मे ऐवजी ३० जून तारीख ग्राह्य धरावी.

४] एका शाळेवर प्रशासकीय बदलीसाठी ५ वर्षे व विनंती बदली साठी ३ वर्षे सेवेची अट असावी.

५] जिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांची विनंती बदलीसाठी पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरावी.

६] स्तनदा माता व एकल महिलांना बदलीस प्राधान्य द्यावे.

७] सन २०११ -२०१२ मध्ये प्रशासकीय बदलीने बाहेर तालुक्यात गैरसोईच्या बदली झालेल्या व सन २०१८-२०१९ मध्ये विस्थापित व रेन्डम राऊंडमध्ये गैरसोईची बदली झालेल्या शिक्षकांना बदलीस प्राधान्य द्यावे.

८] NIC मध्ये गैरप्रकार करणाऱ्या व बदल्यात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी.

९] संवर्ग १ मधील शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी पडताळणी करावी व खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. 

इत्यादी बाबी हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभ्यास गटाच्या समोर मांडण्यात आल्या.

सर्व बाबीवर सकारात्मक चर्चा करुन बदली धोरणात बदल करुन धोरण जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले. या बैकठीस बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद, सदस्य डाँ.संजय कोलते, कान्हुराज बगाटे, सर्जेराव गायकवाड , विनय गौडा हे उपस्थित होते.

शालेय शिक्षक विभागाशी संबंधित प्रश्नाबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

१] जुनी पेन्शन योजना लागू करणे

२] प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ३० व ४० हजार करणे

३] सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन खंड २ प्रकाशित करणे

४] जि. प. व मनपा, न. प शाळेतील इयत्ता १ ली ते ८ पर्यतच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे.

५] २० पटा पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बंद नकरणे.

६] शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेश सुविधा देणे.

७] प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी फी माफीसाठी आर्थिक तरतूद करणे.

८] इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना १०, २०, ३० आश्वासित योजना लागू करणे.

९] उच्च प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापकाचे पद मान्य करणे.

१०] जिल्हा परिषदेच्या शाळेला सेवकाचे पद निर्माण करणे.

११] केंद्रीय शाळेला लिपिक किंवा संगणक ऑपरेटर चे पद देणे.

१२] सन १९९९ नंतर नवीन निर्माण केलेल्या तालुक्यातील गटशिक्षण कार्यालयात लिपीक व सेवकांची पदे निर्माण करणे.

१३] केंद्र प्रमुखाची पदे प्राथमिक पदवीधर शिक्षकातूनच पदोन्नतीने भरणे.

१४] निमशिक्षकांचा वरिष्ठ श्रेणीसाठी मुळनेमनुक दिनांक ग्राह्य धरणे.

१५] शिक्षकांची बी.एल.ओ.सह इतर अशैक्षणिक कामातून मुक्तता करणे.

या प्रश्नांची चर्चा वर्षा गायकवाड यांच्यासोबत झाली. त्यांनी पुढील आठवड्यात चर्चेसाठी बोलावून प्रश्न सोडवू, असे सांगितले. 

 

 

Back to top button