CBSE 10th Result 2024
CBSE 10th Result 2024

सीबीएसई १० वी चा निकाल जाहीर, निकाल इथे पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने आज, १३ मे रोजी सीबीएसई इयत्ता १० वीचा निकाल जारी केला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि cbse.gov.in वर निकाल पाहू शकता. यावर्षी, इयत्ता १० वी मध्ये ९३.६० टक्के विद्यार्थी यशस्वी झाले. यावर्षीची इयत्ता १० वी पास टक्केवारीत ०.४८ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ९३.१२ विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ९० टक्के आणि ९५ टक्के गुण आणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सर्व विषयांमध्ये ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीपेक्षा १९,५७९९ वरून वाढून यावर्षी २११६१४५ झाली आहे. तर ९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या मागील वर्षी ४४२९७ वरून वाढून यावर्षी ४७९८३ इतकी झाली आहे.

कसा पाहाल निकाल?

  • सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जा.
  • होमपेज पर Class X Results 2024 Announced लिंकवर क्लिक करा
  • आता स्टुडेंट रोल नंबर, स्कूल नंबर व ॲडमिट कार्ड आयडी टाका
  • सीबीएसई बोर्डाचा १० वी चा निकाल स्क्रीनवर येईल.

हेदेखील वाचा – 

logo
Pudhari News
pudhari.news