इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट व्हायचंय? | पुढारी | पुढारी

इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट व्हायचंय? | पुढारी

योगेश देसाई

जर आपल्याला फायनान्स, बँकिंग, गुंतवणूक, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च आणि इकॉनॉमिक्समध्ये रस असेल तर एक इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून करिअरची निवड करणे ही एक उत्तम संधी ठरू शकते. जर आपण इक्विटी रिसर्च विश्लेषक होण्याचा पर्याय निवडत असाल तर आपण फायनान्स क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य निर्माण करू शकता. इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट कंपनीची आर्थिक माहिती, स्टॉकमधील शेअर, बाँड आणि अन्य इक्विटी आणि आर्थिकसंबंधी घटकांचे सखोल अध्ययन करावे लागते.

इक्विटी रिसर्च विश्लेषक कंपन्या या आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल तयार करतात. आर्थिक बाजारातील एखाद्या संस्थेच्या प्रतिमेबाबतचे आऊटपूट देण्याचे काम रिसर्च अ‍ॅनालिस्ट करत असतात. कंपनीचा नफा आणि तोटा याचे विश्लेषण केले जाते आणि कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सल्ला देण्याचेही काम रिसर्च अ‍ॅनालिस्ट देत असतात. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट हा कोणत्याही संस्थेच्या आर्थिक विभागात संशोधन करण्याचे काम करत असतो. कारण, तो एखाद्या संस्थेच्या शेअरची खरेदी-विक्री, राखून ठेवणे यासंबंधी निगडित सखोलपणे संशोधन करत असतो. या संशोधनातून फायदा आणि नुकसानीचा ताळेबंद करून तो संस्थेला होणारा फायदा आणि नुकसानीची निश्चिती करतो. 

संबंधित बातम्या

• कार्यक्षेत्र : इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्टला काम करताना आर्थिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. 

खरेदी आणि विक्री : खरेदीच्या श्रेणीत ब्रोकरेज हाऊसबरोबर साईड डील केले जाते, तर ठोक ग्राहकांना सेवा प्रदान केली जाते. विक्रीच्या विभागात अनुसंधान संस्था आणि गुंतवणूक बँकांबरोबर व्यवहार केला जातो. आपण एक संशोधक, विश्लेषक, प्रायव्हेट इक्विटी विश्लेषक, प्रायव्हेट इक्विटी मॅनेजर, पोर्टफोलिओ मॅनेजर होऊ शकता. 

* पात्रता आणि अभ्यासक्रम – जे उमेदवार कला आणि विज्ञान विषयांत अभ्यास करत आहेत, ते उमेदवार देखील या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. आपल्याला अर्थखाते, अर्थशास्त्र, आर्थिक बाजार आणि अन्य आर्थिकसंबंधी मुद्द्यात सखोल ज्ञान आणि आवड असणे गरजेचे आहे. आपल्याला अंगी उत्तम संवादकौशल्य असणे आवश्यक आहे आणि आपले इंग्रजीवर प्रभुत्व असणे तितकेच महत्त्वाचे. काही परदेशी बाजारात स्थानिक भाषेची गरज असते. यासाठी या क्षेत्रात करिअर करताना परकीय भाषेचे ज्ञान देखील आपले करिअर अधिक उज्ज्वल करू शकते.  बहुतांश कंपन्या एमबीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्टच्या पदावर नियुक्त करण्यास प्राधान्य देतात. आर्थिक विषयात एमबीए, चार्टर्ड अकाऊंट किंवा एखाद्या मान्यताप्राप्त कॉलेजमधील अभियंता असोत, वित्तीय कंपन्या अशा पदवीप्राप्त उमेदवारांची निवड करण्यास उत्सुक असतात. आपण बँकिंग आणि फायनान्समध्ये ग्लोबल पी.जी. डिप्लोमा देखील करू शकता. यात एम.बी.ए. किंवा सी.ए.चे अध्ययन केले जाते. अशा प्रकारचे उमेदवार कोणत्याही कंपनीकडून, संस्थेकडून निवडले जातात. 

* इक्विटी विश्लेषकाची जबाबदारी

कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीला दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडणे हे पहिले काम असते. काही जबाबदार्‍या एखाद्या इक्विटी रिसर्च विश्लेषकाला देखील सोपवलेल्या असतात. ते शेअरबाजाराची समिक्षा करतात आणि इक्विटी रिसर्च करतात. आर्थिक विश्लेषण आणि अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करण्याचे काम इक्विटी विश्लेषक करत असतो. 

* संधी – बँक, ब्रोकरेज, कंपनी, क्रेडिट रेटिंग इंडस्ट्रीज, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री, प्रायव्हेट इक्विटी फर्म, म्युच्युअल फंड, कन्सल्टिंग फर्म आदींमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात आपल्याला कोेणत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचे आहे, हे ठरवणे गरजेचे आहे. 

* वेतनमान – एखाद्या इक्विटी रिसर्च विश्लेषकाला दरवर्षी लाखो रुपये मिळू शकतात. जसजसा अनुभव वाढत जाईल, तसतसे आपल्या वेतनात वाढ होत जाते. बँकिंग, फायनान्समध्ये ग्लोबल पी.जी., डिप्लोमा, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि आर्थिक कार्यक्रम उपलब्ध असून ते विद्यार्थ्यांना बँकिंग आणि आर्थिक संस्थेत नाव उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून देते. अर्थशास्त्र, सांख्यिकी आणि संशोधन यात रस ठेवणारे विद्यार्थी सहजपणे या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतात.

Back to top button