बीड : नोकरीच्या शोधात युवकाची आत्महत्या | पुढारी

बीड : नोकरीच्या शोधात युवकाची आत्महत्या

किल्ले धारूर (बीड) : पुढारी वृत्तसेवा 

धारूर तालुक्यात आत्महत्याच्या कालच्या घटनेनंतर आज सकाळी आवरगाव येथे दुसरी आत्महत्येची घटना घडली आहे. धारूरपासून तीन किलोमीटर आवरगाव येथील जय प्रदीप जगताप या युवकाने आत्महत्या केल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.

वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मधील अरविंद जगताप यांच्या त्या पत्राला मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं उत्तर 

आवरगाव येथील युवक हा खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. त्याने इयत्ता बारावी करून इलेक्ट्रिशियन आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी लागत नसल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. तो धारूर शहरातील आडस रोडवरील चौकामध्ये दुकानात रात्री झोपण्यासाठी आला होता  त्याठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आज सकाळी ६ वाजता खेळण्यासाठी मित्र दुकानाच्या दारात आल्यानंतर आवाज दिला. पण, आतून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने त्यांने दरवाजाच्या सांदीतून पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांना सूचना दिली. 

वाचा – बुलडाणा : माता न तू वैरिणी! सावत्र आईने गरम तव्यावर उभे केले, चिमुकल्‍याचे दोन्ही तळवे भाजले

Back to top button