सराफ दुकानावर दरोडा, १४ किलो सोन्यावर डल्ला! | पुढारी

सराफ दुकानावर दरोडा, १४ किलो सोन्यावर डल्ला!

बोईसर (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा 

बोईसर शहरातील चित्रालय परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा (Robbery in jewelry shop in bhoisar) पडला आहे. श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स या दुकानात रात्रीचा फायदा घेत बाजूच्या गाळ्याची भिंत तोडून सोन्याचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. यात चोरट्यांनी तब्बल १४ किलो सोने तसेच ग्राहकांचे ६० लाख रुपये किंमतीचे दागिने असे ७ कोटी ६० लाख किमतीचा माल लुटून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटना मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. भर मार्केट वस्तीत ही चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

एकच मास्क धुवून अनेकवेळा वापरता का? बातमी आपल्यासाठी!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोईसर शहरातील चित्रालय परिसरात श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स आहे (Mangalam Jewelers in Chitralaya area at Boisar city). पाटील यांचा हा पिढाजात व्यवसाय असून त्यांच्या दोन पिढ्या सराफ व्यवसाय (Saraf business) करतात. काल मंगळवारी रात्री (दि. २९) त्यांनी दुकान बंद केले आणि घरी गेले. सकाळी दुकानावर आल्यानंतर दुकान फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

ब्रिटीश हवाई सेवेवरील बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवली

चोरीची घटना मोठी असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे (Palghar Superintendent of Police Dattatreya Shinde), डीवायएसपी विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासले असता यामध्ये सहा ते सात चोरट्यांचा सहभाग दिसून येत आहे. चोरांनी दुकानात एक मणी देखील ठेवला नाही. या चोरीमुळे सुवर्णकारांचे धाबे दणाणले आहे. तर एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने पाटील कुटुंब पुरते हादरून गेले आहे. 

Back to top button