तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या काळात तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे यांनी हे अॅप तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया, डॉ. सचिंद्र प्रताप सिंह यांनीदेखील अॅप सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पीएमपीमध्ये कालावधी पूर्ण होण्याआधीच होणार्या बदल्यांमुळे पीएमपीचे अॅप काही सुरू झाले नाही. मात्र, डॉ. सचिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात गुगल पे सुविधा सुरू झाली आहे. मात्र, अधिकार्यांच्या आणि वाहकांच्या भ्रष्ट मानसिकतेमुळे ही सेवा किती दिवस चालणार हे पाहावे लागणार आहे. त्यासोबतच आत्ताचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी पीएमपीचे अॅप सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, त्यांना यामध्ये यश येणार की नाही, तसेच, त्यांचीसुद्धा अॅप सुरू होण्याअगोदर बदली होणार का, हे आता पाहावे लागणार आहे.