Micronutrients for crops : पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेची… | पुढारी

Micronutrients for crops : पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेची...

वनस्पतीची वाढ, (Micronutrients for crops) फुलोरा आणि फळधारणा या क्रियांसाठी विविध जैविक पदार्थांची गरज असते आणि अशा पदार्थांच्या कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यास बोरॉन उपयुक्त ठरते.

माणसाला जशी अन्नद्रव्यांची (Micronutrients for crops) आवश्यकता असते तशीच ती पिकांच्या वाढीसाठीही गरजेची असतात. अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही आणि त्यावर वेगवेगळे रोग पडतात. त्यासाठी या अन्नद्रव्यांची पूर्तता होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पिकांच्या वाढीमध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची (Micronutrients for crops) भूमिका महत्त्वाची असते. त्यामध्ये लोह, बोरॉन, जस्त अशा अन्नद्रव्यांचा समावेश करता येईल. अप्रत्यक्षरीत्या हरितद्रव्याची निर्मिती प्रकाशसंश्लेषण क्रिया वृद्धिंगत करण्यासाठी लोह उत्पादन होते. वनस्पतीच्या जीवनात विविध जैव-रासायनिक क्रिया सुरू असतात. या क्रियेत लोहाचा उत्प्रेरक म्हणून सहभाग असतो. लोहामुळे प्रथिनांच्या निर्मिती कार्यासदेखील चालना मिळते. या अन्नद्रव्यांचे वहन अगदीच कमी असल्यामुळे हे अन्नद्रव्य मुळांपासून इतर अवयवात पोहोचण्यास खूपच विलंब लागतो. त्यामुळे लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर आणि पिकांच्या बिंदूवर दिसू लागतात. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे उसावर केवडा पडतो.

त्याच्या कमतरतेमुळे कोवळी अपरिपक्क आणि नव्याने येणार्‍या शेंड्यावरील पांनाच्या शिरांमधील भाग पिवळा होतो. अधिक कमतरता असेल, तर पिवळी पाने पांढरट होतात. झाडाची वाढ (Micronutrients for crops) खुंटते. त्यावर उपाय म्हणून 0.5 टक्के हिराकसची अथवा फेअर अमोनियन सल्फेटची (0.5 टक्के द्रावणाची) फवारणी करावी.

वनस्पतीची वाढ, फुलोरा आणि फळधारणा (Micronutrients for crops) या क्रियांसाठी विविध जैविक पदार्थांची गरज असते आणि अशा पदार्थांच्या कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यास बोरॉन उपयुक्त ठरते. द्विदल वर्गातील पिकांत प्रथिनांचे प्रमाण तसेच गळीत धान्यांमध्ये तेलांचे प्रमाण, तसेच गळीत धान्यांमध्ये तेलांचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते. नत्र स्थितीकरण क्रियेत बोरॉन उपयुक्त ठरते असे दिसून यते.

बोरॉनची कमतरता असल्यास झाडाचा शेंडा (Micronutrients for crops) आणि कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. यावर उपाय म्हणून 50 ग्रॅम बोरिक अ‍ॅसिड पावडरची 100 मीटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी.

वनस्पतीच्या जीवनक्रमात अनेक विविध जैव-रासयनिक क्रिया सुरू असतात. (Micronutrients for crops) त्यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. विकरांचे कार्य, वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनयुक्त पदार्थ निर्माण कार्य यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. त्याची कमतरता असेल, तर पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. यावर उपाय म्हणून हेक्टरी 10-12 किलो झिंक सल्फेट जमिनीमधून देणे किंवा अर्धा ते एक किलो झिंक सल्फेट 100 लिटर पाण्यातून (0.5-1 टक्का) पिकांवर फवारावे.

– विलास कदम 

Back to top button