केळी लागवडीतून करा अर्थार्जन, पीक घ्या वर्षभर केव्हाही | पुढारी

केळी लागवडीतून करा अर्थार्जन, पीक घ्या वर्षभर केव्हाही

केळे हे मुख्यत: उष्णकटीबंधीय पीक असून भारतात हवामानानुसार वेगवेगळ्या जाती घेतल्या जातात. 18 अंश सेल्सिअस इतक्या तापमानात सामान्यपणे केळ्याची वाढ चांगली होते. केळ्यासाठी चांगली कसदार माहिती असणे आवश्यक असते. पुरेशी कस असणारी आणि भुसभुशीत माती केळ्याच्या वाढीला उपयुक्त ठरते. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे फळ म्हणून केळे आपल्याकडे लोकप्रिय आहे. शक्तिवर्धक म्हणूनही आहारात त्याचा वापर केला जातो. केळ्यापासून विविध पदार्थही केले जातात. सर्वसामान्यांना परवडण्यासारखे फळ असल्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही या फळाला कायम मागणी असते. जमीन जास्त आम्लयुक्त आणि क्षारयुक्त नसावी. केळी लागवडीतून सुपीक, कर्ब पदार्थांनी युक्त, भरपूर प्राणवायू असणारी आणि भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असणारी जमीन केळीच्या वाढीसाठी अतिउत्तम आहे.

बुटकी तुकडेवाली, तंबाकू, रोबस्टा, मोनथान, पुवन नेंद्रन, लाल केळे, नयाली, सफेद वेलची, बनारसी, रस्थाळी, अर्धपुरी, कर्पूरवल्ली, कर्दळी, मोठी नैनी आदी जाती भारतात घेतल्या जातात. यापैकी मोठी नैनी ही जात त्याच्या सहनशक्ती आणि जैव तणाव घेऊ शकण्याच्या तसेच घडाच्या उत्तम गुणवत्तेमुळे प्रसिद्धी पावते आहे. या जातीच्या घडाला एकसारखी, सुरक्षित आणि मोठाली अशी केळी येतात. फळाचा रंग पिवळट असून त्याची टिकण्याची क्षमता आणि गुणवत्ता इतर जातीच्या केळींपेक्षा चांगली आहे. केळीच्या लागवडीपूर्वी त्या जमिनीवर हिरव्या भाज्या घ्याव्यात. मग जमीन दोन-चार वेळा नांगरून घ्यावी आणि एका पातळीत आणावी. लोखंडाचा नांगर, कुळपाच्या पाळ्या यांचा वापर करून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीची मशागत करतेवेळी कंपोस्ट खत किंवा कुजलेले शेणखत घालून मिसळावेे.

खड्ड्यात माती आणि शेणखताचे मिश्रण टाकावे

लागवडीसाठी 45 सेंमी बाय 45 सेंमी बाय 45 सेेंमी आकाराचे खड्डे खोदून किंवा सर्‍या पाडून घ्यावा. मग खड्ड्यात माती आणि शेणखताचे मिश्रण टाकावे. 250 ग्रॅम एरंडीची पेंड आणि 20 ग्रॅम कॉन्बोफोरन घालावे. तयार झालेले खड्डे सूर्यप्रकाशासाठी तसेच ठेवावे. त्यामुळे त्यातील हानीकारक विषाणू किंवा किडे मरण्यास मदत होते आणि ती माती सुपीक होते. क्षारयुक्त माती असते आणि सामु 8 पेक्षा जास्त असतो तेथे खड्ड्यांमध्ये शेणखतासोबत नत्रयुक्त जोरखत वापरावे. जमिनीच्या नांगरणीसाठी अंदाजे 500-1000 ग्रॅम वजनाचे खोल नांगर वापरावे. नांगरावर रोगांचे विषाणू किंवा जंतू असू शकतात.

अशा प्रकारच्या मशागतीत उतिसंवर्धन किंवा टिश्यू कल्चर केलेली झाडे लावणे उत्तम ठरते. कारण ही झाडे सशक्त, निरोगी आणि मजबूत असतात. चांगल्या पद्धतीने तयार केलेले ठोंब आणि दणकट बुंध्याची रोपे वापरावीत. उतिसंवर्धन किंवा टिश्यू कल्चर केलेली रोपे वापरल्यामुळे अनेक फायदे होतात. ही रोपे पालक रोपांसारखी आणि व्यवस्थित असतात. तसेच ती कीड आणि रोगांपासून मुक्त असतात. एकसारख्या वाढीमुळे उत्पादन वाढते. या रोपांचे पीक लवकर येते. भारतासारख्या लागवडीसाठी कमी जमीन असणार्‍या देशात लहान जमिनीचा जास्तीतजास्त वापर करता येतो. या रोपांचे वर्षभरात केव्हाही पीक घेता येते याचे कारण ही रोपे वर्षभर मिळतात. कमी वेळात दोनदा पीक घेता येत असल्याने लागवडीचा खर्चही कमी येतो. यामध्ये नवीन प्रकार तयार करता येतात आणि कमी काळात ती वाढवता येतात.

केळीचे पीक वर्षभर केव्हाही घेता येते

उतिसंवर्धन तंत्राचा वापर करून तयार केलेले केळीचे पीक वर्षभर केव्हाही घेता येते; मात्र तापमान फार जास्त किंवा फार कमी नसावे. यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. महाराष्ट्रात जुन-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर असे या पिकासाठी दोन हंगाम चांगले असतात. केळीला चांगले पीक येण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी देण्याची आवश्यकता असते. पण, खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. त्यामुळेच भारतातील तापमानाप्रमाणे केळीच्या लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे हितावह ठरते. केळीच्या पिकाला वर्षाला साधारण 2 हजार लिटर पाणी लागते. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याचा वापर योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे केला जातो. या पद्धतीमुळे 56 टक्के पाण्याची बचत होते आणि उत्पादन 23 ते 32 टक्क्यांनी वाढते.

केळीची पेरणी झाल्यावर लगोलग पाणी द्यावे. केळी लागवडीतून साठी पाणी पुरवठा व्यवस्थित असावा. खोडाजवळ पाणी साठून राहिल्यास मुळाजवळच्या मातीतील हवा उडून जाते आणि त्याचा परिणाम विकास आणि वाढीवर होतो. केळी लागवडीतून त्यामुळेच खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. केळीची मुळे फार नाजूक आणि संवेदनशील असल्याने त्यामध्ये आंतर पीक घेणे फारसे हितावह नाही. पण, मूग, चवळी अशी कमी कालावधीची हिरवी शेंगभाजीची पिके घेतली तरी चालतात; मात्र शेंगभाज्या असल्याने त्यावर कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या पिकांना किटकांपासून वाचवले पाहिजे. झाडावर केळी पूर्णपणे वाढून तयार झाल्यावर घड कापून जलद गतीने ग्राहकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असते. त्यामुळे केळीची गुणवत्ता टिकून राहते.

कापणीनंतर लगेच त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक

फळ फार लवकर पिकते त्यामुळे कापणीनंतर लगेच त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. घडांची संख्या, आकारमान, त्याचे वजन, रंग, कोन इ. गोष्टी पाहून व्यापारी केळ्यांची खरेदी ठरवतात. केळी लागवडीतून बाजारात केळीची किंमत त्याचा कच्चेपणा आणि पिकलेल्या गुणांवरून ठरवतात. पेरणीनंतर 11 ते 12 महिन्यांत झाड कापणीसाठी तयार होते. केळी लागवडीतून पहिले पुनर्पिक 8 ते 10 महिन्यात कापणीसाठी तयार होते तर दुसर्‍या पुनर्पिकाला 8 ते 9 महिने लागतात. ठिबक सिंचन पद्धतीच्या मशागतीत उतिसंवर्धन घेतल्यास केळ्याचे 100 टक्के प्रति उत्पादन घेता येते. पिकाची व्यवस्थित काळजी घेतल्यास पुनर्पिकदेखील तेवढेच घेता येते.
– अनिल विद्याधर

हेही वाचलतं का?

Back to top button