Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २७ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २७ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज प्रभावशाली लोकांसोबतही तुमचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. तरुणांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभ: श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक उर्जेचा अनुभव येईल. यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार यश मिळेल. मुलांना त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यात मदत करा. व्यवसायाची कामे थोडी मंदावतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

मिथुन : आज यशस्वी होण्यासाठी नवीन धोरणे राबवणे आवश्‍यक आहे. तुम्‍ही तुमच्‍या मनोबलाच्‍या जोरावर सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकता. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.कामाची नैतिकता बदलणे तुमच्या व्यवसायासाठी सकारात्मक असेल. पती-पत्नी एकमेकांच्या सहकार्याने कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवतील.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, मुलाच्या करिअर आणि शिक्षणाशी संबंधित चिंतांचे निराकरण होईल. वैयक्तिक कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल. कर्मावर अधिक विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन लोकांशी व्यवहार करताना प्रत्येक स्तरावर चर्चा करा. कौटुंबिक वातावरणात सुख-शांती कायम राहील. अशक्तपणा आणि सांधेदुखीची समस्या जाणवू शकते.

सिंह : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडावेळ कुटुंब आणि मित्रांसाठीही काढा. यामुळे तुम्‍हाला उर्जेचा अनुभव येईल. कोणतेही काम शांतपणे विचार करूनच पूर्ण करा. प्रतिकूल परिस्थितीत संयम कायम ठेवा. आज समस्या असल्यास तुमच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. कौटुंबिक जीवन सामान्‍य राहिल.

कन्या: आज गरजू आणि ज्येष्ठांची सेवा करण्यात आणि काळजी घेण्यात तुम्‍ही अग्रस्‍थानी असाल, असे श्रीगणेश सांगतात. आज उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. घरात आनंदी वातावरण असू शकते. गॅस आणि बद्धकोष्ठतेमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते.

तूळ: श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या रखडलेल्या कामांना गती येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी ते नीट तपासा. गेल्या काही वर्षांपासून कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्येवर तोडगा मिळू शकतो.

वृश्चिक: श्रीगणेश म्‍हणतात की, आज एखादी समस्या सोडवण्यात तुमची विशेष भूमिका असेल. यामुळे तुमच्‍या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. थकवा आल्याने अशक्तपणा जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. बऱ्याच दिवसांनी कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल.

धनु: श्रीगणेश सांगतात की, आज तुमची एखादी अनोळखी व्यक्ती भेटू शकते. प्रगतीचे नवीन मार्गही मिळू शकतात. मुलांकडून कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. योग आणि ध्यानाची मदत घेतल्यास फायदा होईल. सहकार्‍यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. तुमचा लहरी स्वभाव तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ करू शकतो.

मकर: आज वैयक्तिक आणि आर्थिक बाबी संदर्भात महत्त्वाच्या योजनाची अंमलबजावणी कराल. घरातील कामात वेळ जाईल. मुलांसोबत बसून त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात तुम्हाला आनंद मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात अनुभवी व्यक्तीच्या मदतीने चांगली ऑर्डर मिळणे शक्य आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. आरोग्य थोडे नरम राहू शकते.

कुंभ : आज तुमचा मानसिक आणि आध्यात्मिक आनंद कायम राहील, असे श्रीगणेश सांगतात. इच्छित कामे वेळेवर पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. आयुष्यात सर्वकाही असूनही एकटेपणाचा अनुभव येईल. नकारात्मकता टाळा, स्वतःला व्यस्त ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. घरातील कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर कुटुंबातील सदस्यांसोबत नियोजन होईल.

मीन: आज ग्रहांची स्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आळस सोडून आत्मविश्वासाने स्वतःला तुमच्या कामात झोकून द्या. यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील. मुलांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. पती-पत्नी घराच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल. सांधेदुखीची तक्रार जाणवू शकते.

Back to top button