Stock Market Closing Bell | यूस फेडच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा, सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद | पुढारी

Stock Market Closing Bell | यूस फेडच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा, सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२०) अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स ८९ अंकांनी वाढून ७२,१०१ वर बंद झाला. तर निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,८३९ वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाले. (Stock Market Closing Bell)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयाच्या आधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी बुधवारी बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांकांना गती घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. एनर्जी, ऑटो शेअर्समधील तेजीचा बाजाराला सपोर्ट मिळाला. मेटल शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, रियल्टी आणि ऑटो सर्वाधिक वाढले, तर निफ्टी मेटल, फार्मा आणि आयटीमध्ये घसरण झाली. ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, ऑइल अँड गॅस या क्षेत्रीय निर्देशांकात प्रत्येकी ०.५-१ टक्क्यांनी वाढ झाली, तर मेटल निर्देशांक जवळपास १ टक्क्यांनी घसरला.

‘हे’ शेअर्स टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

बीएसई सेन्सेक्सने आज ७२ हजारांच्या पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्स मारुती, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, एसबीआय, आयटीसी, रिलायन्स, टेक महिंद्रा, कोटक बॅंक हे शेअर्स तेजीत राहिले. तर टाटा स्टील, टाटा मोटर्स, अॅक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर आयशर मोटर्स, मारुती, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, ओएनजीसी हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर, टाटा मोटर्स, अॅक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Closing Bell)

Reliance Power शेअर्स तेजीत

अनिल अंबानींच्या Reliance Power कंपनीने आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि DBS बँक या तीन बँकांची देणी चुकवल्याच्या वृत्तानंतर रिलायन्स पॉवरचा शेअर वधारला. हा शेअर्स बीएसईवर सुमारे ५ टक्क्यांनी वाढून २३.८३ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. (Reliance Power Share Price)

 हे ही वाचा :

 

Back to top button