Stock Market Closing Bell | ६ दिवसांच्या तेजीनंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स- निफ्टी घसरून बंद | पुढारी

Stock Market Closing Bell | ६ दिवसांच्या तेजीनंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स- निफ्टी घसरून बंद

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील गेल्या सहा सत्रांतील तेजीला बुधवारी (दि.२१) ब्रेक लागला. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीने सर्वकालीन उच्चांक नोंदवल्यानंतर बाजारात घसरण झाली. निफ्टीने आज २२,२४९ अंकांला स्पर्श केला होता. त्यानंतर निफ्टी १४१ अंकांनी घसरून २२,०५५ वर स्थिरावला. तर सेन्सेक्स ४३४ अंकांनी घसरून ७२,६२३ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप १.२७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप ०.८४ टक्क्यांनी घसरला. बाजारात अस्थिरता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसून आली. (Stock Market Closing Bell) यामुळे सेन्सेक्स- निफ्टी घसरले. (Stock Market Closing Bell)

बँकिंग, फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्समधील तेजीमुळे निफ्टीने आज सुरुवातीच्या व्यवहारात नवा उच्चांक गाठला होता. निफ्टीने आज २२,२४९ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. पण त्यानंतर तो २२ हजारांवर स्थिरावला. निफ्टीवर बीपीसीएल, कोल इंडिया, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, विप्रो हे शेअर्स घसरले. तर टाटा स्टील, एसबीआय, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स वाढले.

निफ्टी पीएसयू बँक आणि रियल्टी निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांत घसरण झाली. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक १ टक्क्याने घसरले. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसही खाली आला.

सेन्सेक्स आज ७३ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,७०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एलटी, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन हे शेअर्स घसरले. तर टाटा स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स वाढले.

पेटीएम शेअर्समध्ये रिकव्हरी

पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications च्या शेअर्समध्ये बुधवारी तिसऱ्या सलग सत्रात रिकव्हरी दिसून आली. या शेअर्सला आजही ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दुपारच्या सत्रात हा शेअर्स ३०५.०५ रुपयांवर होता. RBI ने Paytm Payments Bank (PPBL) वर कठोर निर्बंध लादल्यानंतर ४१ जानेवारीनंतर पेटीएम शेअर्सला मोठा फटका बसला. फिनटेक फर्म पेटीएमचा हा शेअर्स अजूनही ३१ जानेवारीच्या बंद किंमतीच्या ७६१.२० रुपयांच्या तुलनेत ४८ टक्क्यांनी खाली आहे. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजार

फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याने बुधवारी आशियाई बाजारात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात चीनमधील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १ टक्के वाढला. अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक काल घसरून बंद झाले होते. नॅस्डॅक, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि एस अँड पी हे निर्देशांक घसरले.

हे ही वाचा :

 

Back to top button