Stock Market Updates | खरेदीचा जोर वाढला! सेन्सेक्सची ९५० अंकांची उसळी, काही क्षणात गुंतवणूकदार ३.५ लाख कोटींनी श्रीमंत | पुढारी

Stock Market Updates | खरेदीचा जोर वाढला! सेन्सेक्सची ९५० अंकांची उसळी, काही क्षणात गुंतवणूकदार ३.५ लाख कोटींनी श्रीमंत

Stock Market Updates : शेअर बाजारातील मागील तीन सत्रांतील घसरणीला सोमवारी (दि.९) ब्रेक लागला. जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज शेअर बाजारात तेजी आली. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी वाढून ६०,५०१ वर तर निफ्टीने १८० अंकांनी वाढून १८ हजारांवर व्यवहार केला. त्यानंतर दुपारी १२च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे ९८० अंकांनी उसळी घेत ६०,८७९ वर पोहोचला होता. तर निफ्टी २८० अंकांनी वाढून १८,१४० वर गेला. सेन्सेक्सची ही वाढ १.५९ टक्के तर निफ्टीची वाढ १.५२ टक्के एवढी आहे. या तेजीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूदारांना ३.५५ लाख कोटींचा फायदा झाला आहे. (Investors richer by Rs 3.55 lakh crore)

खेरदीचा जोर वाढला

आज सोमवारी सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी २.४५ टक्क्याने आणि निफ्टी ऑइल अँड गॅस १.२३ टक्क्याने वाढला. बँका, वित्तीय, ऑटो, मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि एफएमसीजी शेअर्स तेजीत आहेत. तर निफ्टी मिडकॅप ५० हा ०.९८ टक्के आणि स्मॉलकॅप ५० हा १.०२ टक्क्याने वधारला आहे.

‘हे’ शेअर्स आघाडीवर

टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील यांचे शेअर्स आघाडीवर आहेत. हे शेअर्स १.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. विप्रो, भारतीय एअरटेल, टीसीएस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्सदेखील हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

‘या’ कारणांमुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात तेजी

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल आणि कोरोना संकटातून बाहेर पडून चीनमधून आर्थिक देवाणघेवाण सुरु होईल या शक्यतेने सोमवारी आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूदारांच्या भावना उंचावल्या आहेत. (Stock Market Today) अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक वधारले आहेत. तसेच आशियाई बाजारही तेजी आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक १.५ टक्के वाढून पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर दक्षिण कोरियातील शेअर्स २.१ टक्के वाढले आहेत. हाँगकाँगचे शेअर्स १.४ टक्के वाढून वर गेले आहेत. (Stock Market Updates)

दरम्यान. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी (दि. ६) २,९०२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १०८३ कोटींचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button