Stock Market Today | तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला

Stock Market Today | तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला

Stock Market Today : शेअर बाजारातील मागील तीन सत्रांतील घसरणीला सोमवारी ब्रेक लागली. जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज सोमवारी (दि.९) शेअर बाजारात तेजी आली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी वाढून ६०,५०१ वर तर निफ्टी १८० अंकांनी वाढून १८ हजारांवर व्यवहार करत होता. टाट मोटर्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील यांचे शेअर्स आघाडीवर होते. हे शेअर्स १.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. विप्रो, भारतीय एअरटेल, टीसीएस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्सदेखील हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी १.२५ टक्के आणि निफ्टी ऑइल अँड गॅस निर्देशांक १.२३ टक्के वाढला. बँका, वित्तीय, ऑटो, मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि एफएमसीजी शेअर्सही तेजीत उघडले.

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल आणि कोरोना संकटातून बाहेर पडून चीनमधून आर्थिक देवाणघेवाण सुरु होईल या शक्यतेने सोमवारी आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूदारांच्या भावना उंचावल्या आहेत. (Stock Market Today)

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी (दि. ६) २,९०२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १०८३ कोटींचे शेअर्स खरेदी केले.

 हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news