अर्थव्यवस्थेची जोमाने वाटचाल... | पुढारी

अर्थव्यवस्थेची जोमाने वाटचाल...

भारतात आता औद्योगिक प्रगती वेगाने होत आहे. संशोधन आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर द्रुतगतीने काम होत आहे. गेल्या आठवड्यात ‘आपण भारत’ या योजनेअंतर्गत देशात तयार झालेल्या विशेष पोलादामुळे नौदलाच्या खर्चात तीन हजार कोटी रुपयांची बचत झाली. नौदलात दाखल होत असलेल्या नवीन युद्धनौकांमध्ये ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या या पोलादाचा वापर केला जात आहे. हा एकूण 11 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

आतापर्यंत युद्धनौका उभारण्यासाठी पोलाद आयात केले जात होते; पण संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ)2008 मध्ये यावर संशोधन सुरू केले. त्याचेच द़ृश्यफल आता दिसत आहे. पोलादाचे आयुष्य वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे पोलादाचा कणखरपणा व ताकद वाढते. आता 249 ब हे विशेष पोलाद आपण विकसित केले आहे. हे पोलाद व्यावसायिक उत्पादनासाठी दिले आहे. एकूण 11 हजार कोटी रुपयांच्या पोलादाची निर्मिती यामुळे झाली आहे. त्यामुळे 3 हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचेल.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुरी झाली आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार सरकारी नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या जातील. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल अनेक मतप्रवाह असले तरी ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या आंतरराष्ट्रीय वित्तीय सल्लागार संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सकारत्मक चित्र रंगवले आहे. पुढील 5 वर्षांत म्हणजेच सन 2027 अखेर भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसर्‍या अर्थव्यवस्थेचा मान मिळवील. पुढील दशकात जगाच्या एकूण विकासात भारताचा वाटा 20 टक्के असेल. याचे मोठे श्रेय आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) कपात केली असली तरीही येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाटचाल करील, असे ‘मॅार्गन स्टॅन्ले’चे मत आहे. त्यामुळे देशातील दरडोई उत्पन्नही (Per Capitaincome) वाढेल. भारताचा जीडीपी सध्या 3.4 लाख कोटी डॉलर आहे. पुढील 10 वर्षांत तो दुपटीपेक्षा जास्त वाढून 8.5 लाख कोटी डॉलरची (1 डॉलर = 85 रुपये) पातळी गाठेल. भारतीय जीडीपी मध्ये दरवर्षी 400 अब्ज डॉलरहून अधिक रकमेची भर पडेल. त्यामुळे अमेरिका व चीन हे दोनच देश आपल्या पुढे असतील.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दिवाळी असे साधारणत: 15 दिवसांच्या अंतराच्या येणार्‍या सणांमुळे देशातील वाहन विक्रीच्या चांगलेच पथ्थ्यावर पडले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत (ऑक्टोबरच्या) यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 48 टक्के वाढ झाली आहे. वाढते रोजगार, सुधारलेले चांगले रस्ते व वाढणारे नागरीकरण याचा हा परिणाम आहे. चारचाकी प्रवासी वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दुुचाकीच्या (स्वयंचलित) मागणीतही 51 टक्के वाढ झालेली आहे.
सध्या मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकाने 61 हजारांपर्यंत वाटचाल केली आहे.

साखरेचे देशात विक्रीची उत्पादन झाल्यामुळे 31 मे 2023 या वर्षात 60 लाख टन साखर निर्यात होणार आहे. 2022-2023 या चालू हंगामात देशांतर्गत वापरासाठी 2 कोटी 75 लाख टन साखर उपलब्ध आहे. याच हंगामात 50 लाख टन साखर इथेलॉन निर्मितीसाठी वापरली जाईल. पेट्रोलमध्ये इथेलॉन मिसळल्यामुळे पेट्रोलचे भावही भडकणार नाहीत.

हंगामाच्या शेवटी 50 लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. साखरेच्या निर्यातीमुळे विदेशी चलनाच्या साठ्यात चांगली भरही पडेल. दसर्‍यापासून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन व कारखाने सहकारी तत्त्वावर आहोत. उत्तर प्रदेश व अन्य ऊस उत्पादक राज्यात लवकरच साखरेचे उत्पादन सुरू होईल.

‘एसआयपी’ (सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टींग फ्रॅन) ला सध्या वाढती मागणी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये म्युच्युअल फंडात निदेशकांनी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

म्युच्युअल फंडातील इक्विटी (समभाग) प्रकारात सातत्याने गुंतवणूक होत आहे. जुलै 2020 ते फेब—ुवारी 2021 या काळात मात्र इक्विटी फंडातून 46,700 कोटी रुपये गुंतवणूक काढली गेली होती. म्युच्युअल फंड फोलिओची संस्था ऑक्टोबर 2022 मध्ये 13.91 कोटी झाली.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button