Stock Market Closing Bell | बाजारात ब्लडबाथ! सेन्सेक्स ७३२ अंकांनी घसरून बंद, गुंतवणूकदारांना २.२५ लाख कोटींचा फटका

Stock Market Closing Bell | बाजारात ब्लडबाथ! सेन्सेक्स ७३२ अंकांनी घसरून बंद, गुंतवणूकदारांना २.२५ लाख कोटींचा फटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या सारख्या हेवीवेट्स शेअर्समधील विक्रीच्या दबावाने शुक्रवारी भारतीय शेअर बाजार कोसळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल १,१२६ अंक म्हणजे १.५ टक्क्यांनी घसरून ७३,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २८९ अंकांनी घसरून २२,३४८ पर्यंत खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ७३२ अंकांच्या घसरणीसह ७३,८७८ वर स्थिरावला. तर निफ्टी १७२ अंकांनी घसरून २२,४७५ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, रियल्टी, टेलिकॉम आणि पीएसयू बँक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. सत्राच्या सुरुवातीला नवा उच्चांक गाठल्यानंतर निफ्टी निर्देशांकात दबावाखाली गेला. बीएसई मिडकॅप ०.२ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्के घसरला.

गुंतवणूकदारांचे उडाले २.२५ लाख कोटी

आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी झाले. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ३ मे रोजी ४०६.२४ लाख कोटी रुपयांवर आले. २ मे रोजी ते ४०८.४९ लाख कोटी रुपयांवर होते.

लोकसभा निवडणूक, बाजारात अस्थिरता

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सध्या सुरु असलेली लोकसभा निवडणूक, कंपन्यांचे चौथ्या तिमाईतील कमाई अहवाल आणि यूएस फेडकडून व्याजदर कपातीला होत असलेला विलंब आदी घटक बाजारातील घडामोडीला कारणीभूत ठरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी संबंधित अटकळींचे वावटळ उठले आहे. लोकसभा निवडणूक निकालाची ४ जूनची तारीख जशी जवळ येईल तशी बाजारात अस्थिरता आणखी वाढणार असल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

निफ्टी उच्चांकावरून माघारी

देशांतर्गत बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी तेजीत सुरुवात केली होती. निफ्टीने २२,७९४ अंकाला स्पर्श करत नवा उच्चांकी विक्रम नोंदवला होता. तर सेन्सेक्स ३७५ हून अधिक अंकांनी वाढून ७५ हजारांवर व्यवहार सुरु केला होता. सुरुवातीला बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह शेअर्समधील तेजीचा बाजाराला सपोर्ट मिळाला होता. पण तेजी अधिक काळ टिकून राहिली नाही.

'हे' हेवीवेट्स शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, रिलायन्स, नेस्ले इंडिया, एलटी, मारुती हे शेअर्स सर्वाधिक घसरले. भारती एअरटेलचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून १,२५८ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर तो १,२७५ रुपयांवर गेला. रिलायन्सचा शेअर्स २,८६० रुपयांवर आला. जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, कोटक बँक, टेक महिंद्रा हे शेअर्सही घसरले. दरम्यान, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह यांनी तेजीत व्यवहार केला.

sensex closing
sensex closing

आज सकाळी २२,७६६ अंकावर खुला झालेला निफ्टी ५० निर्देशांक २२,३४८ पर्यंत खाली आला. त्यानंतर तो २२,४०० वर स्थिरावला. निफ्टीवर एलटी, रिलायन्स, मारुती, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर कोल इंडिया, डॉ. रेड्डीज, ग्रासीम, अपोलो हॉस्पिटल, ओएनजीसी हे शेअर्स तेजीत राहिले.

Nifty 50
Nifty 50

Bajaj Finance तेजीत

आजच्या ट्रेडिंग सत्रात बजाज फायनान्सचा शेअर्स बीएसईवर ७ टक्क्यांनी वाढून ७,४०० च्या दिवसांच्या उच्चांकावर पोहोचला. दुपारच्या व्यवहारात त्याची तेजी कमी होऊन तो १ टक्के वाढीसह ७ हजारांवर आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने कंपनीच्या दोन प्रमुख ग्राहक मिळवणाऱ्या उत्पादनांवर तात्काळ प्रभावाने निर्बंध उठवल्यानंतर बजाज फायनान्सचे शेअर्स वधारले. (Bajaj Finance shares)

आशियाई बाजार

भारतीय शेअर बाजारातीलच नव्हे आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी लाल रंगात व्यवहार केला. जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट. दक्षिण कोरियाचा कोस्पी यांनी नकारात्मक पातळीवर व्यवहार केला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news