LIC Listing : एलआयसी शेअरचे कमजोर Listing, तरीही बनली भारताची पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी | पुढारी

LIC Listing : एलआयसी शेअरचे कमजोर Listing, तरीही बनली भारताची पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी

पुढारी ऑनलाईन डेस्क

एलआयसी विमा कंपनीचा शेअर (LIC Listing) आज बीएसई आणि एनएसईवर सुचिबद्ध झाला. दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर एलआयसी शेअरचे लिस्टिंग इश्यू प्राइसच्या तुलनेत डिस्काउंटमध्ये झाली. पण यामुळे एलआयसी IPOमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची निराशा झाली. पॉलिसी होल्डर्सचीदेखील निराशा झाली. ६० रुपयांचा डिस्काउट असूनही गुंतवणूकदारांना नफा मिळवण्यासाठी संधी मिळाली नाही. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या चिन्हासह खुला झाला. याचा फायदा एलआयसीच्या शेअर्सच्या लिस्टिंगला झाला नाही.

एलआयसी शेअरच्या कमकुवत लिस्टिंगमुळे (LIC Listing) गुंतवणूकदारांना ४२,५०० कोटींचा फटका बसला. यामुळे बाजार मुल्य ५.५७ लाख कोटी रुपयांवर घसरले. जे इश्यू प्राइस दरम्यान सुमारे ६ लाख कोटींवर होते.

मंगळवारी सकाळच्या सत्रात एनएसईवर एलआयसीच्या शेअरचा भाव ८९९.५० रुपये होता. तर तो BSE वर ८.६२ टक्के डिस्काउंटसह ८६७.२ रुपयांवर सूचिबद्ध झाला होता.

एलआयसीचे बाजार मूल्य ६ लाख २४२ कोटी रुपये आहे. पण एलआयसी शेअरच्या लिस्टिंगच्या पहिल्या काही मिनिटांत बाजार मुल्य ५ लाख ५७ हजार ६७५ कोटी रुपयांवर आले. पण हे बाजार मुल्य हिंदूस्तान युनिलिवर आणि आयसीआयसीआयच्या तुलनेत अधिक आहे. कमजोर लिस्टिंग झाले असतानाही एलआयसी पाचवी सर्वात मोठी बाजार मुल्य असणारी कंपनी बनली आहे. हिंदुस्तान युनिलिवरचे बाजार मुल्य ५.३३ लाख कोटी, तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मुल्य ४.८५ लाख एवढे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे बाजार मुल्य एलआयसी पेक्षा अधिक आहे.

एलआयसीचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. सौदी अरेबियाच्या सौदी अराम्को या कंपनीच्या आयपीओशीही एलआयसीची तुलना करण्यात आली आहे. गतवर्षी पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा होता, तो आतापर्यंत भारतीय भांडवल बाजारातील सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता.

Back to top button