शेअर बाजारात गुंतवणूक जास्त फायद्याची | पुढारी

शेअर बाजारात गुंतवणूक जास्त फायद्याची

योगेश लाटणेकर – तांत्रिक विश्‍लेषक व वायदा बाजाराचे प्रशिक्षक, निफ्टी पोजिशन, पुणे

शेअर बाजारात गुंतवणूक करताना साधनांइतके किंवा त्यापेक्षा वेगळे यात काय मिळणार? हे पाहू.

1)  सुरक्षितता :- शेअर बाजारात आपण पूर्वी बरेच घोटाळे ऐकले असतील. उदा ः- हर्षद मेहता घोटाळा, केतन पारेख घोटाळा. पण आता सरकारने सेबी (सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया)ची स्थापना करून ऊशारींशीरश्रळीशव करून हा सर्व व्यवहार संगणकीकृत केला आहे. त्यामुळे पूर्ण सुरक्षित आहे. 

2) तरलता :- ङर्र्ळिींळवळी शेअर बाजारात खूप मोठ्या संख्येने व्यवहार होतात. तुम्ही खरेदीस इच्छुक असाल तेव्हा तुमच्यासमोर खूप संख्येत शेअर्स उपलब्ध असतील व तुमचे शेअर्स विकायचे असतील तर खरेदीदार पण प्रचंड असतील पण दोघांना म्हणजेच खरेदीदार व विक्रेत्याला  मान्य असलेल्या किंमतीलाच व्यवहार होतो. 

3) उत्पन्‍न :-  बँकेत  पैसे ठेवले तर त्यावर फक्‍त मुद्दलाबरोबर व्याजच मिळते. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यावर खालीलप्रकारे फायदे होतात. 

अ) शेअर्सच्या किंमतीत वाढ (Capital Appreciation):- एखादा शेअर आपण ठराविक किंमतीला विकत घेतल्यावर काही कालावधीनंतर त्याची किंमत वाढली तर वाढलेली किंमत हा त्या खरेदीदाराचा फायदा होय. 

ब) लाभांश (Dividend)…- कंपनी फायद्यात असेल तर भागधारकांना लाभांश मिळतो. लाभांश शेअर्सच्या  face value म्हणजे मूळ किंमतीवर दिला जातो. मार्केट किंमतीवर नाही.  

क) कर माफी (Tax Rabate)…– एक वर्षापेक्षा जास्त काळ शेअर्स आपल्या डिमॅट खात्यावर असतील तर त्यावर झालेला फायदा करपात्र नसतो. 

ड) बोनस भाग (Bonus Share)…- फायद्यातील कंपन्यांचे व्यवस्थापन भागधारकांना बोनस शेअर्स देतात व शेअर्सची संख्या त्या प्रमाणात वाढते. त्याचा अप्रत्यक्ष फायदा त्या शेअर्सच्या मार्केट किंमतीत वाढ होण्यासाठी वाव राहतो. 

इ) अग्रहक्‍क भाग (Preferential Share):- प्रत्यक्ष शेअर बाजारात असलेली कंपनी तिच्या विस्तार योजनांसाठी आणखी भाग भांडवल विक्रीला काढते. तेव्हा जुन्या भागधारकांना प्रथम पसंतीने व इतरांपेक्षा थोड्या कमी किंमतीने शेअर्स देते. त्यास अग्रहक्‍क भाग म्हणतात. 

ता. क. चालू आठवड्याच्या सुरुवातीला निफ्टी 10500 ते 10400 या पातळीतच राहील. या महिन्याची वायदा बाजाराची समाप्ती या गुरुवारी 28 डिसेंबरला असल्यामुळे मार्केटमध्ये बुधवारपासून व्होलाटिलीटी वाढेल. 10500 च्या दरम्यान निफ्टी फ्युचर्स विकावे. स्टॉपलॉस 10535 व लक्ष्य 10400 ठेवावे व 10500 चा पुट ऑप्शन खरेदी करावे. चांगला फायदा होईल. 

Back to top button