पर्याय फ्लेक्सी सिपचा | पुढारी | पुढारी

पर्याय फ्लेक्सी सिपचा | पुढारी

मिलिंद सोलापूरकर

शेअर बाजारातील चढउतारामुळे आणि जोखीम असल्याने अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर राहणे पसंत करतात. ज्यांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसते, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक फायद्याची ठरते. दीर्घकाळासाठी इक्विटी म्युच्युअल फंडने किमान पंधरा टक्के परतावा दिला आहे. यातही एकरकमी पैसे गुंतवणूक करण्यापेक्षा दरमहा गुंतवणूक करणारी एसआयपी पद्धत ही आजच्या घडीला लोकप्रिय मानली जाते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट सुविधा ही आपल्याला निश्‍चित दिवशी म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवणुकीची संधी देते. आता एसआयपीने पुढचे पाऊल टाकत व्हेरियंट फ्लेक्सी सिप सुविधा बाजारात आणली आहे. यात सुरुवातीपासूनच निश्‍चित फॉर्म्यूल्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवणे किंवा कमी करण्याची सुविधा या माध्यमातून मिळते. बाजारात तेजी असताना गुंतवणूकदार रक्कम कमी करू शकतो, तर बाजारात घसरगुंडी असताना एसआयपीची रक्कम वाढविण्याचा पर्याय राहतो. 

कोणता अर्ज भरण्याची गरज?

फ्लेक्सी एसआयपीसाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो. तो ऑनलाईन किंवा ऑफलाईनही फंड मॅनेजर कंपन्यांकडे सादर करता येतो. अ‍ॅसेंट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी)मध्ये एसआयपी इन्स्क्ट्रक्शन रजिस्टर करताना फ्लेक्सी एसआयपीचा पर्याय निवडता येतो. यासाठी विशेष फॉर्म भरण्याची गरज असते. एसआयपी अ‍ॅप्लिकेशन फॉर्ममध्ये देखील गुंतवणूकदार फ्लेक्सी सुविधेची निवड करू शकतात. 

फिक्स्ड इन्स्टॉलमेंट रक्‍कम : गुंतवणूकदारांना एसआयपीची किमान रक्कम निश्‍चित करावी लागते. निश्‍चित केलेल्या दिवशी गुंतवणकूदारांना गुंतवणूक करावीच लागते. एसआयपीचा कालावधीनुसार फ्लेक्सी एसआयपीचा किमान कालावधी नोंदणीकृत करता येतो. कमाल कालावधी तीन ते पाच वर्षांचा असू शकतो. यात मासिक किंवा तिमाहीच्या आधारावर गुंतवणूक करावी लागते. 

लक्षात ठेवा : एसआयपीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम ही निश्‍चित असते. जर पुरेसे बॅलेन्स नसल्यास किंवा तांत्रिक कारणामुळे एसआयपीची रक्कम उलटली जात असेल तर फिक्स्ड इन्स्टॉलमेंट अकाऊंटमध्ये फ्लेक्सी एसआयपीत राहिलेली रक्कम मार्गी लावली जाते. म्हणजेच वर्षभरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात येणारी एसआयपीची रक्कम कमी किंवा जास्त केली जात असेल तर, राहिलेली रक्कम ही फिक्स्ड इन्स्टॉलमेंटमध्ये राहते. या रक्कमेतूनच पुढील वाढीव एसआयपीची भरपाई केली जाते.

 

Back to top button