Indri Whisky बनवणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर्स तुफान तेजीत, रोज लागतेय अप्पर सर्किट! कारण काय? | पुढारी

Indri Whisky बनवणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर्स तुफान तेजीत, रोज लागतेय अप्पर सर्किट! कारण काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात एका शेअर्सने रॉकेट भरारी घेतली आहे. तो म्हणजे व्हिस्की बनवणाऱ्या पिकॅडिली ॲग्रो लिमिटेडचा (Piccadily Agro Industries Limited) शेअर्स. या शेअर्सने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देत मालामाल केले आहे. गेल्या पाच दिवसांत पिकॅडिली अॅग्रोच्या शेअर्स २१ टक्क्यांनी वाढला आहे. आज हा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून ६०५ रुपयांवर पोहोचला. या शेअर्सने वर्षभरात १,१८० टक्के परतावा दिला आहे.

पिकॅडिली ॲग्रो ही इंद्री ब्रँड (Indri Whisky) नावाने सिंगल माल्ट व्हिस्की बनवते. या कंपनीचे मुख्यालय हरियाणात आहे. या व्हिस्कीला जगातील बेस्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. या व्हिस्कीने गेल्या काही वर्षात १४ पुरस्कार जिंकले आहेत. इंद्री व्हिस्कीने गेल्या वर्षी २०२३ व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवार्ड्समध्ये ‘बेस्ट इन शो, डबल गोल्ड’ खिताबावर मोहर उमटवली होती. यामुळे या व्हिस्कीची लोकप्रियता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पिकॅडिली अॅग्रो कंपनीचा शेअर्स तुफान तेजीत आहे. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांत या शेअर्सला सलग ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे.

जर एका वर्षापूर्वीच्या चार्टवर नजर टाकल्यास पिकाडिली ॲग्रोच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना १,१८० टक्के परतावा दिला आहे. मे २०२३ मध्ये या शेअरची किंमत ४६ रुपयांच्या पातळीवर होती. एका वर्षात हा शेअर सुमारे ५५९ रुपयांनी वाढला आहे.

Piccadily Agro Industries ने मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात ८२९ कोटींचा महसूल मिळवला. कंपनीने महसुलात ३० टक्के वाढ नोंदवली आहे. संपूर्ण वर्षाचा निव्वळ नफा ११२.१३ कोटी रुपये आहे. जो एका वर्षापूर्वीच्या २४ कोटी नफ्याच्या तुलनेत सुमारे ३.४ पट आहे. (Indri Whisky)

हे ही वाचा :

 

 

Back to top button