Gold Silver Price Update : सोन्याने घेतली मोठी उसळी, दर ५४ हजार पार, चांदीही महागली | पुढारी

Gold Silver Price Update : सोन्याने घेतली मोठी उसळी, दर ५४ हजार पार, चांदीही महागली

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षादरम्यान सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात (Gold Silver Price Update) तेजी आली आहे. सराफा बाजारात आज बुधवारी (दि.९) सोन्याचा दर ७३५ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५४,२८३ रुपयांवर खुला झाला. तर चांदी प्रति किलो ७१,८०० रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी (Gold Silver Price Update) शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५४,२८३ रुपये, २३ कॅरेट सोने ५४,०६६ रुपये, २२ कॅरेट सोने ४९,७२३ रुपये, १८ कॅरेट सोने ४०,७१२ रुपये आणि १४ कॅरेट सोने ३१,७५६ रुपयांवर आहे. तर चांदी प्रति किलो ७१,८७८ रुपये आहे. (हे दुपारी ३ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आदी कारणांमुळे सोन्याला जबरदस्त मागणी आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

Back to top button