Heel Pain : टाचा दुखताहेत? ‘हे’ उपाय करा, आराम मिळेल | पुढारी

Heel Pain : टाचा दुखताहेत? 'हे' उपाय करा, आराम मिळेल

डॉ. सुनीलकुमार जाधव

हल्ली बैठ्या कामाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जेव्हा खूप वेळ एकाच स्थितीत बसल्यानंतर व्यक्ती उभी राहते तेव्हा टाचांमध्ये तीव्र वेदना होतात. या वेदना पुन्हा थोडे बसले किंवा चालले की गायब होतात. ( Heel Pain )

संबंधित बातम्या  

काही वेळा मात्र आराम केल्यानंतर या वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात. एक-दोन दिवसात टाचदुखी किंवा पायाचे हे दुखणे कमी होईल, असाच विचार आपण करतो. मात्र, या दुखण्यावर वेळीच इलाज केला पाहिजे, अन्यथा दुखणे वाढून गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

उभे राहताना, चालताना किंवा धावताना शरीराचे वजन पायावर पडते आणि टाचांच्या मदतीने ते जमिनीवर टाकले जाते. त्यामुळेच टाचांच्या ऊती किंवा लिगामेंटस् सूजतात. अनेकदा हाडांमध्ये काट्यासारखा उंचवटा तयार होतो आणि टाचा सतत दुखतात किंवा वेदना होत राहतात.

आहारात बदल करण्याबरोबरच आधुनिक पद्धतीच्या चपला किंवा पादत्राणे देखील टाचेच्या या दुखण्याला जबाबदार असतात. सर्वसाधारणपणे चपला किंवा बूट यांचे तळवे कडक होतात त्यामुळे पायाचा पंजा किंवा टाचा यांच्यावर दाब येतो. टाचांच्या या वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या खाणे हा उपाय असला तरीही तो टाळून व्यायामाच्या मदतीने आपण टाचांचे दुखणे टाळू शकतो किंवा कायमचे थांबवू शकतो.

याव्यतिरिक्त आपण जे बूट किंवा पादत्राणे घालतो त्याला हील कॅप आणि जाडसर सिलिकॉन पॅड देखील लावू शकतो. ज्या व्यक्तींना टाचेचे हे दुखणे सतावते त्या व्यक्तींनी थंड आणि कोमट पाण्याने पायाला शेक घ्यावा. त्यामुळे वेदनांमध्ये आराम मिळतो. टाच दुखत असताना फरशीवर बिना चप्पल चालणे टाळावे. अर्थात व्यायामाने किंवा वरील उपायांनीही काहीच फरक जाणवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. ( Heel Pain )

Back to top button