फराळाच खाऊन अजीर्ण झालं आहे ? या घरगुती उपायांनी पडेल आराम | पुढारी

फराळाच खाऊन अजीर्ण झालं आहे ? या घरगुती उपायांनी पडेल आराम

पुढारी ऑनलाईन : दिवाळीचे दिवस सुरू झाले की खाण्या-पिण्याच्या पदार्थांची चंगळ असते. अशा वेळी पोटाच्या तक्रारी पण सुरू होतात. खाताना हे पदार्थ चवीला कितीही चांगले वाटत असले तरी आरोग्य आणि पोट यांची मात्र चांगली बेजार अवस्था होते. अनेकदा करपट ढेकर, पित्त, अजीर्ण, पोटदुखी सुरू होते. अशा वेळी अनेकदा बाहेरून औषध घेतली जातात. पण असे काही घरगुती उपायही आहेत जे पूर्णपणे सुरक्षित आहेत याशिवाय पटकन आरामही मिळून जातो. पाहुयात असे काही सोपे उपाय..

काळे मीठ आणि ओवा : पोटदुखीवर उपाय म्हणून ओवा खाण्यासाठी आजी कायमच सांगायची. कारण ओवा पचनशक्ती सुधारतो. अन्न पचवण्यासही मदत करतो. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ओवा आणि काळे मीठ टाकून प्यावे. यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम दूर होण्यासही मदत होते.

हिंग : वासाला उग्र आणि मसाल्याच्या पदार्थात अनेकांचा नावडता असलेलं हिंग पोटाच्या तक्रारीवर गुणकारी आहे. जर तुम्हाला पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होत असेल तर पाव चमचा हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने लगेच बरं वाटण्यास मदत होईल.

कच्चे लसूण : लसूण खाणे म्हणजे अनेकांना शिक्षा वाटू शकते. उग्र वास आणि तशीच उग्र चव असलेल्या लसूण अनेकांचा नावडता आहे. कच्चा लसूण चावून खावा. त्यावर लगेच कोमट पाणी प्या.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस : पोटाचा त्रास सुरू झाल्यावर अनेकजण सोडा पिण्यास प्राधान्य देतात. पाव चमचा काळे मीठ आणि बेकिंग सोडा याशिवाय लिंबाचा रस मिसळावा. याने लगेच आराम मिळेल. बाहेरचा सोडा पिण्यापेक्षा हा सर्वोत्तम उपाय आहे.

जीरे पाणी : जिरं पित्तासाठी उत्तम उपाय आहे. जिरे पाण्यात थोडा वेळ उकळावा. त्यानंतर हे मिश्रण प्याव यामुळे पित्त आणि अजीर्णयापासून लवकर सुटका होते.

 

Back to top button