ठाणे: बदलापुरात भरदुपारी मतदारांच्या रांगा; ज्येष्ठ नागरिक, नवमतदारांमध्ये उत्साह

ठाणे: बदलापुरात भरदुपारी मतदारांच्या रांगा; ज्येष्ठ नागरिक, नवमतदारांमध्ये उत्साह

बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : भिवंडी लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कुळगांव बदलापूर नगरपालिका हद्दीतील विविध मतदान केंद्रावर भर दुपारीही मतदारांनी रांगाच रांगा लावल्या होत्या. बदलापूर पूर्वेकडील, गांधी चौक, कात्रप, खरवई तर पश्चिमेकडील बेलवली इंद्रिय पाडा रमेश वाडी आदी परिसरात मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. बदलापुरात तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्यावर असताना देखील मतदारांनी लावलेल्या रांगांमुळे हे मतदान नक्की कोणाला होणार याबाबत सध्या राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे.

बदलापुरात कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे अशी थेट लढत असून अपक्ष उमेदवारांचा या ठिकाणी कोणताही प्रभाव नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे बदलापुरातून होणार जास्तीच मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे, उत्सुकतेच ठरणार आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत असलेल्या विविध मतदान केंद्र ही तळमजल्यावर उघड्या जागेत उभारण्यात आली आहेत त्यामुळे मतदारांना अनेक ठिकाणी उन्हात उभे राहावे लागत होते मात्र मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता प्रत्येक प्रभागातील बीएलो हे मतदान केंद्रावर बसून असल्यामुळे मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत तुरळक प्रमाणात होत्या. बदलापूर शहरात नव मतदार तसेच विशेष करून जेष्ठ मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा 
 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news