Benefits Of Almond : बदाम खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्‍यदायी आणि आश्चर्यकारक फायदे | पुढारी

Benefits Of Almond : बदाम खाण्याचे 'हे' आहेत आरोग्‍यदायी आणि आश्चर्यकारक फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क: आपल्याकडे बदाम हे ड्रायफ्रुट हे केवळ बुद्धिवर्तक असल्याचे समजले जाते. बदामात मुबलक प्रमाणात पोषकद्रव्ये असतात, म्हणून ते दैनंदिनीत खाणे गरजेचे असते. बदामात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट यांसारखे समृद्ध घटक असतात, त्यामुळे ते सर्व प्रकारे मानवी आरोग्यास फायदेशीर असते. बदाम हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते. यापेक्षाही बदाम खाण्याने मानवी शारीर आणि मानसिक आरोग्यावरही आश्चर्यकारक फायदे (Benefits Of Almond) होतात. चला तर पाहूया, बदाम सेवनाचेआरोग्याच्या दृष्टीने फायदे…

 मुबलक पोषकत्त्वे असलेले ड्रायफ्रुट

बदमामध्ये कार्बोहायड्रेड (22%), प्रथिने (21%) आणि फॅट (50%) इतके घटक असतात. याचबरोबर व्हिटॅमिन बी, रायबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मँग्निज, फॉस्फरस आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बदामाला मुबलक पोषकत्त्वे असलेले ड्रायफ्रुट (Benefits Of Almond) समजले जाते.

बदामाचे उत्पादन कोठे होते ?

द. युरोप, अमेरिका (कॅलिफोर्निया), ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका या प्रदेशांत बदामाची लागवड आढळते. भारतात काश्मीरात ठराविक उंचीच्या प्रदेशात बदाम पिकविला जातो. बदाम लागवडीखाली सुमारे २,४०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते; तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात बदामाचे पीक काढले जाते.  उत्तर प्रदेशातील काही डोंगराळ भागातसुद्धा अक्रोड व बदामाची लागवड केली जाते.

संबंधित बातम्या

Benefits Of Almond: ‘हे’ आहेत बदामाचे आश्चर्यकारक फायदे

अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत

बदाम हे अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. या घटकामुळे पेंशींचे ऑक्सिडेटिव्हपासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते. ऑक्सिडेशनमुळे येणारा ताण तसेच यामुळे होणारे पेशींचे नुकसान भरून काढण्यास बदाम हे एक उत्तम स्त्रोत म्हणून काम करते. वयोवृद्ध आणि आजारी माणसांच्या आरोग्यामध्ये बदाम महत्त्वाची भूमिका बजावते.

‘व्हिटॅमिन-ई’चा सर्वोत्तम स्त्रोत

बदाम हा व्हिटॅमिन ई चा जगातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. अन्नातून भरपूर व्हिटॅमिन ई मिळविणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. अनेक अभ्यासांमध्ये व्हिटॅमिन ईचा आहारात समावेश केल्‍याने  हृदयविकार, कर्करोग आणि अल्झायमर यांसारख्या भयंकर आजारांपासून दूर राहण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

रक्तातील साखर नियंत्रणास मदत

बदामासारख्या बियांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते,परंतु निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जो मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. बदामामध्ये असणारे मॅग्नेशियमचे उल्लेखनीय प्रमाण हे एक वरदानच आहे. कारण अनेक स्त्रोतांनुसार मॅग्नेशियमचे हेच प्रमाण रक्तातील साखर नियंत्रण करण्यास मदत करते. टाइप 2 मधुमेह असलेल्या 25-38% लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते. बदमाच्या सेवनाने ही कमतरता दूर होते आणि रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊन इंसुलिनचे कार्य सुधारण्यास देखील मदत होते.

रक्तदाब पातळी नियंत्रित राहते

शरीरातील मॅग्नेशिअम पातळी कमी असणे म्हणजे उच्च पातळीचा रक्तदाब असणे. त्यामुळे शरीरात मुबलक मॅग्नेशिअमची पातळी असणे हे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे बदाम हे उच्च रक्तदाब असलेल्यांना रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता दूर केल्यास याप्रकारच्या आजारांचा धोका टाळता येतो.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

एलडीएल या बॅड कोलेस्टेरॉलमुळे ह्दयरोगाचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन बदाम खाणे हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. बॅड कोलेस्टेरॉल कमी झाल्याने हृदयरोगाचा धोकाही टळण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

बदामामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असल्याने कितीही खाल्ले तरी ते खाल्यासारखे वाटत नाहीत, म्हणून ते आपण जास्त खातो. या कारणाने वजन वाढल्याचे समजले जाते.पण काही अभ्यासामध्ये असे सांगण्यात आले आहे की, बदाम हे वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या मोनोसेच्युरेटेड फॅट तुमची भूक रोखण्यात आणि पोट दीर्घकाळ भरलेले असल्याची जाणीव देते. यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुम्ही कमी जेवण करता, यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक तेवढीच भूक लागते.

हाडे मजबूत होतात

बदामामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांचे आरोग्य सुधारतात आणि फ्रॅक्चरपासून तुमचे संरक्षण करू शकतात. म्हणून दररोज बदाम खाण्याने तुमची हाडे मजबूत होतात. बदाम खाण्याने तुमच्या शरीरातील साध्यांचा पुरेसे ऑईस मिळाल्याने साधेदुखी सारखा त्रास कमी करण्यास मदत होते.

डोळ्यांचे संरक्षण होते

गाजर हे डोळ्यांसाठी खूप चांगले आहे असे म्हटले जात असले तरी, बदामामध्ये व्हिटॅमिन ईचा उच्च स्रोत असतो. जो डोळ्यांचे संरक्षण करतो आणि डोळ्यांच्या लेन्समध्ये होणारे असामान्य बदल टाळतो. अशाप्रकारे, बदाम खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते.

त्वचेचे पोषण करते

बदाम हे त्वचेच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. बदामामध्ये फ्लेव्होनॉइड हा घटक असतो, जो प्रामुख्याने ग्रीन टी आणि ब्रोकोलीमध्ये आढळतो. हा घटक तुमच्या त्वचेचे पोषण करतो आणि तुमच्या त्वचेला वृद्धत्वाविरोधी लढण्यास मदत करतो.

मेंदूची शक्ती वाढण्यास मदत

बदामामध्ये L-carnitine आणि riboflavin हे घटक असतात जे मेंदूच्या पेशींच्या वाढीस मदत करतात. फेनिलॅलानिन हे देखील मेंदूला त्याच्या संज्ञानात्मक कार्यात मदत करणारे एक प्रमुख रसायन आहे जे बदामामध्ये मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढत मेंदूंची कार्यक्षमता देखील वाढते.

हेही वाचा:

Back to top button