मधुमेह आणि उच्च रक्तदाब | पुढारी | पुढारी

मधुमेह आणि उच्च रक्तदाब | पुढारी

– डॉ. प्रदीप गाडगे

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार एकत्रितपणे असल्याने अधिक धोकादायक ठरू शकते. रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही व्याधी ज्यांना असतील, त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. मधुमेह व रक्तदाबाचा एकत्रित त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये सर्वसाधारणपणे मधुमेहाची सुरुवात सर्वात आधी होते, असे दिसून येते. मधुमेहाच्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. रक्तदाब आणि मधुमेह या दोघांना एकत्रितपणे अतितीव्र आजार म्हणूनही ओळखले जाते. टाईप 1 मधुमेह असलेल्या सुमारे 25% आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या 80% लोकांना उच्च रक्तदाब असतो.मधुमेहींना हृदयरोग, किडनी विकार, स्ट्रोक आदी आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहींना रक्तदाबाची समस्या असल्यास अशाप्रकारचे आजार जडण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, 1980 आणि 2014 मध्ये भारतीय पुरुषांमधील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण अनुक्रमे 3.7 टक्के ते 9.1 टक्के आणि 24.5 टक्के ते 26.6 टक्के अनुक्रमे वाढ झाल्याचे दिसून आले. तर महिलांमध्ये अनुक्रमे 4.6 टक्के ते 8.3 टक्के, तर 22.7 टक्के ते 24.7 वाढ झाली आहे. अहवालानुसार भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण 6.1 टक्के आणि पुरुषांमध्ये 6.5 टक्के आहे. तर उच्च रक्तदाबाचे प्रमाण पाहता महिलांमध्ये 20 टक्के आणि पुरुषांमध्ये 24.5 टक्केइतके आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या तुलनेत 18-25 वर्षांच्या वयोगटातील 12.1 टक्के वयोगटातील उच्च प्रौढांमध्ये उच्च प्रमाणात रक्तसंक्रमण असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.  

महिलांमध्ये 20 टक्के आणि पुरुषांमध्ये 24.5 टक्के अतिपरिणाम प्रभावित झाले आहेत. सिस्टोलिक रक्तदाब हा 110 ते 140 (मि. मी. पारा.. ाा ेष कस) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा 90 च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा 140 च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा 90 पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अतिरक्तदाब (कूशिीींशपीळेप) आहे, असे समजावे. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच मधुमेहापासून होणारा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत अचूक बदल करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. लोक निरोगी जीवनशैलीच्या सवयींसह उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात. यात व्यायाम आणि कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन, ,जेवणात मिठाचे प्रमाण कमी करणे याचा समावेश आहे.

 

Back to top button