झोपण्यापूर्वी मनुका खाल्ल्याने होतात अनेक लाभ

झोपण्यापूर्वी मनुका खाल्ल्याने होतात अनेक लाभ
Published on
Updated on

बेदाणे, मनुका हे चांगली झोप लागण्यापासून तर पाचन तंत्र सुरळीत करण्यापर्यंत अनेक कारणांसाठी फायदेशीर आहे. मनुकाला हिंदीत 'किशमिश' नावाने देखील ओळखले जाते. मनुका म्हणजे वाळलेले द्राक्ष जे अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते. झोपण्यापूर्वी दोन मनुका खाल्ल्यास चांगली झोप लागते तसेच पाचनात सुधारणा होते. हृदयाचे आरोग्य वाढते.

मनुक्याच्या सेवनाचे हे काही लाभ

मनुकामध्ये मेलाटोनीन नावाचे हार्मोन असते. जे चांगली झोप येण्यासाठी प्रभावी असते. एका अध्ययनामध्ये माहिती झाले आहे की, झोपण्यापूर्वी मनुका खाणार्‍या लोकांना झोपेच्या गोळ्या घेणार्‍या लोकांपेक्षा चांगली व सुरक्षित झोप लागते.

मनुकामध्ये विरघळणारे म्हणजेच विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन प्रकारचे फायबर आहे. विरघळणारे फायबर पाण्यात विरघळून जाते व एक जेलसारखा पदार्थ बनतो जो पचनाला सहाय्य करतो. तसेच रक्त शर्कराच्या स्तराला नियंत्रित करण्यासही तो मदत करतो. अविद्राव्य फायबर पाचनतंत्र सुधारते. झोपण्यापूर्वी मनुका खाल्ल्यास आरोग्याला खूप फायदा होतो.

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासही मनुका सहाय्यक ठरतो. मनुकामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशीयम, अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्याला वाढवते. पोटॅशियम रक्तदाबाला नियंत्रित करण्यास मदत करते. मॅग्नेशीयम हृदयाच्या स्नायूंना कार्य करण्यात मदत करते. अँटिऑक्सिडेंट हृदयाला मुक्त कणांपासून होणार्‍या नुकसानीपासून वाचवते.

मनुका रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हाडांना मजबूत करते. मनुकामध्ये लोहतत्व असते जे एनिमिया थांबवण्यासाठी मदत करते. तसेच मनुका त्वचेचे वय होण्याची प्रक्रिया हळू करते.

सावधानी

जर तुम्ही मधुमेह किंवा हायपोग्लइसिमीया या आजारांनी ग्रस्त असाल तर मनुका खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनुकामध्ये नैसर्गिक साखर असते जी तुमच्या ब्लडप्रेशरला वाढवू शकते. जर तुम्हाला मनुकाची एलर्जी असेल तर मनुका खाणे टाळावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news