चिंच खावी सर्वांनी! | पुढारी | पुढारी

चिंच खावी सर्वांनी! | पुढारी

प्रियांका जाधव

चिंच फक्‍त स्त्रियांनीच खावी, त्यांनाच ती खावीशी वाटते, असा काहींचा समज किंवा गैरसमज असतो. पण खरे तर चिंच ही मानवी शरीरासाठी उपयुक्‍त आहे. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष; कुणीही खाल्ली तरी त्यांच्या शरीरास ती फायदेशीरच ठरते. चला बघूया, चिंच कशाकशा पद्धतीने उपकारक ठरू शकते ते…

पिकलेली चिंच भूक वाढवते.

संबंधित बातम्या

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

रक्‍ती आव, जुलाब विकारात चिंचोके पाण्यात वाटून देतात.  

पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्याने भाजीत किंवा आमटीत वापरल्याने तोंड स्वच्छ होते.

चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात. वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेले औषध पोटदुखीवर परिणामकारक ठरू शकते. लिंबू रसाबरोबर ते घेतले जाते.

चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.

चिंचोक्यांचा उपयोग चामड्याच्या कामासाठी तसेच चपला बनविण्यासाठी केला जातो.

सकाळी शौचाला साफ होत नसेल आणि मलावरोधाची सवय असेल तर पुढील उपाय करून पाहावा, असे काही मंडळी सुचवतात – एक किलो चांगली पिकलेली चिंच घ्यावी. ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर चिंच कुसकरून ते पाणी गाळून घ्यावे. पाणी अर्धे आटवावे. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रोज रात्री थोडे थोडे प्यावे. आरोग्यद‍ृष्ट्या फायदेशीर ठरेल.

 

Back to top button