कोल्हापूर : गडहिंग्लज पालिकेकडून निर्जतुकीकरण कक्ष  (video) | पुढारी

कोल्हापूर : गडहिंग्लज पालिकेकडून निर्जतुकीकरण कक्ष  (video)

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज नगरपालिकेच्यावतीने पालिकेसमोर कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी निर्जुंतकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. पालिकेने आजच्या आरोग्य दिनाच्या निमित्ताने या कक्षाची उभारणी शहरामध्ये येणारी वाहने तसेच व्यक्तींना निर्जतुकीकरण करण्याची मोहीम आखली आहे. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या प्रेरणेतून नगरसेवक महेश कोरी यांच्या पुढाकारातून या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

वाचा :कोल्हापूर : सबीयाने वाढदिवसासाठी साठवलेले ११ हजार दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला!

गडहिंग्लज शहर ते तीन तालुक्याची बाजारपेठ असून याठिकाणी अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी मोठया प्रमाणात लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या कालावधीमध्ये शहराबाहेरून येणार्‍या व्यक्तींना आता या कक्षातूनच प्रवास करावा लागणार असून यामुळे याचा फायदा होणार आहे.

या कक्षामध्ये सोडीयम क्लोराईड, पाणी याचा वापर करून निर्जुतुकीकरण करण्यात आले असून आज सायंकाळी याची चाचणी करून घेतल्यानंतर हा खुला करण्यात आला आहे. पालिकेच्यावतीने याबाबत नियोजन उदयापासून राबवण्यात येणार असून शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी पालिकेने घेतलेली ही खबरदारी अतिशय चांगल्या प्रकारची आहे.

वाचा :कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील १६ जण संस्था विलगीकरणात

Back to top button