कोल्हापूरकरांना दिलासा; कोरोनाचे आणखी ७ अहवाल निगेटिव्ह | पुढारी

कोल्हापूरकरांना दिलासा; कोरोनाचे आणखी ७ अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालांपैकी कोरोना संशयितांचे आणखी सात अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी पाठवण्यात आलेले ५२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दोन दिवसांतील सर्व ४१ अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा : कोल्हापूर : ‘त्या’ पॉझिटिव्ह महिलेच्या कुटुंबातील पाचजणांसह १७ जण कोरोना निगेटिव्ह 

कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह १७ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला होता.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा चौथा रुग्ण आढळून आला होता. सीपीआरमध्ये उपचार सुरू असलेल्या कसबा बावडा येथील एका ६३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. भक्तिपूजानगर पाठोपाठ शहरातील प्रमुख परिसर असलेल्या कसबा बावड्यात रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. कसबा बावडा परिसर तातडीने प्रतिबंधित करण्यात आला असून, कसबा बावड्याकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.

वाचा : ‘केशरी कार्डधारकांनाही माफक दरात धान्य देणार’

 

Back to top button