कोल्हापूर : सीपीआरमध्ये स्वॅब कलेक्शन केबीन | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरमध्ये स्वॅब कलेक्शन केबीन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

सीपीआर प्रशासनाने रुग्णांच्या कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यासाठी कोरोना कक्षात विशेष स्वॅब कनेक्शन केबीन उभा केली आहे. या केबीनमधूनच स्वॅब घेतले जातात. रूग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये तीन ते चार फूट अंतर राहते. त्यामुळे डॉक्टरांना कोरोनाच्या संर्सगाचा धोका नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाची धास्ती रूग्णांसह डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांनी घेतली आहे. कोरोना बाधितांवर उपचार करताना जगात त्याचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची झोप उडाली आहे. पण कोरोनाचे युध्द जिंकण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील बिनीचे शिलेदार झुंजत आहेत. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून विविध प्रकारची शक्कल लढवली जात आहे.

सीपीआर वैद्यकीय उपचारात तसं पुढेच आहे. येथे अनुभवी डॉक्टर आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांमध्ये रूग्णालयाने विश्वास निर्माण केला आहे. आता या तज्ञांनी कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी चक्क केबीन उभा केली आहे. संशयित रूग्ण कोरोना आयसोलेशन कक्षात दाखल झाल्यानंतर त्यांच्या घशातील स्वब घेले जाते. स्वॅब घेताना रूग्ण, डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांचा संशयित रूग्णांशी थेट संपर्क येत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक  होता.  पण आयसोलेशन कक्षात उभा केलेली ही केबीन डॉक्टर व कर्मचारी यांना आधारवड ठरली आहे. केबीनला समोर काच आहे. काचेतून हात बाहेर करता येईल एवढीच जागा आहे. बाकी केबीन पूर्णता बंदिस्त आहे. केबीनच्या बाहेर रूग्णाला बसवून स्वब घेतला जातो. महाराष्ट्रातील ही पहिली केबीन असावी असा दावा सीपीआर प्रशासनाने केला आहे.

संबंधित बातम्या

सीपीआरमध्ये दोन कोरोना संशयित व्हेंटिलेटरवर 

 कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

सीपीआरचा कोरोना कक्ष रुग्णांसाठी आधारवड ठरला आहे. खासगी चार रूग्णालयात कोरोनासाठी आयसोलेशन कक्ष तयार आहेत. पण, सीपीआरच्या या कक्षावर रूग्णांचा भरोसा आहे. सध्या येथील कोरोना कक्षात दोन संशयित गंभीर असून ते व्हेंटिलेटर वर आहेत.

कोरोनाच्या धास्तीने उपचारासाठी नाकारलेले रूग्ण थेट येथे येतात. आज महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात एका रूग्णाला येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा सीपीआरच्या कोरोना कक्षात मृत्यू झाला. सध्या येथील आयसोलेशन कक्षात दोन रूग्ण कोरोना संशयित गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. त्यांच्या घशातील स्वब घेतले असून तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतर ते कोरोना निगेटीव्ह आहेत की पॉझिटीव्ह हे कळेल. सीपीआरच्या वैद्यकीय पथकाचे विशेष लक्ष या रुग्णांवर आहे.

Back to top button