पुणे : महिला नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण | पुढारी

पुणे : महिला नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा शिरकाव आता थेट नगरसेवकांपर्यंत पोहोचला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील एका महिला नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात आता प्रामुख्याने झोपडपट्टी भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाच्या या आजाराचा संसर्ग आता थेट महापालिका कर्मचार्‍यांपासून थेट नगरसेवकांपर्यंत पोहोचला आहे. त्यात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नगरसेविका आणि तिच्या मुलाची कोरोनाच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली. प्रामुख्याने नागरिकांना मदत देताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने हे प्रकार घडत आहे. यापुर्वी शिवाजीनगर भागातील नगरसेविकेच्याच कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

 

Back to top button