गर्भधारणा आणि ओटीपोटाचा क्षयरोग | पुढारी | पुढारी

गर्भधारणा आणि ओटीपोटाचा क्षयरोग | पुढारी

डॉ. इंद्रनील जाधव

पेल्विक  ओटीपोटाच्या क्षयरोगाने (ट्यूबरक्लोरसिस) पीडित असलेल्या दहा पैकी 2 महिलांना गर्भधारण होत नाही. महिलांना असणार्‍या या रोगाची टक्केवारी 40 ते 80 टक्क्यांइतक्या प्रमाणात आहे. हा रोग त्या महिलांना अधिक प्रमाणात होतो ज्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमजोर आहे किंवा जे संक्रमित व्यक्‍तींच्या सहवासात आलेल्या असतात.  जेव्हा संक्रमित व्यक्‍ती खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते बॅक्टेरिया हवेत पसरतात आणि जेव्हा आपण श्‍वास घेतो तेव्हा त्याचे विषाणू आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन आपणाला त्याचे संक्रमण होते. संक्रमित व्यक्‍तीसोबत शारीरिक संबंध ठेवणे हे या रोगाचे एक कारण असू शकते.

या बॅक्टेरियाचा शिरकाव अत्यंत सहज आणि शांतपणे होत असल्याने संक्रमण  झाल्यावर याची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. महिलांमध्ये ओटीपोटाचा क्षयरोग हा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो. ज्यात अनियमित पाळी, योनीतून निघणारा स्राव ज्यात रक्‍ताचे गोळेसुद्धा पडू शकतात आणि शारीरिक संबंध ठेवल्यावर जनेंद्रियामध्ये दुखणे ही लक्षणे संक्रमण भरपूर वाढल्यावर दिसून येतात. पुरुषांमध्ये वीर्य स्खलन न करू शकणे, शुक्राणूंची गतिशीलता कमी होणे आणि पिट्युटरी ग्रंथीपासून उत्पन्‍न होणार्‍या हार्मोन्सची संख्या कमी होणे किंवा हार्मोन्स उत्पादन न करू शकणे ही लक्षणे दिसून येतात.

संबंधित बातम्या

ओटीपोटाच्या क्षयरोगाचे निदान करणे खूप कठीण आहे, मात्र आता बर्‍याच प्रकारच्या तांत्रिक उपकरणांमुळे या रोगाचे निदान करता येऊ शकते. जी महिला ओटीपोटाच्या क्षयरोगाने पीडित आहे तिच्या गर्भाशयातील नलिका आणि इतर भागांचे नमुने घेऊन चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. जेथे बॅक्टेरिया उत्पन्‍न होतो त्याच्या चाचणीसाठी नंतर वेगळे नमुने पाठविले जातात. 

डॉक्टर ते विषाणूचे परीक्षण लेप्रोस्कोपीच्या माध्यमातून करतात. त्या भागातील मासाचा तुकडा विषाणूच्या परीक्षणासाठी पाठविला जातो त्यानंतर त्या रुग्णाला  क्षयरोग आहे अथवा नाही याचे निदान होते. बरेच डॉक्टर सर्जरीचा निर्णय घेतात; मात्र याबाबतीत त्या तितक्याशा यशस्वी ठरत नाहीत. शेवटी बाळ होण्यासाठी  इन-विट्रो फर्टिलाइजेशन किंवा इंट्रासाइटोप्लाोज्मिक स्पर्म इंजेक्शन (आईसीएसआई)चा आधार घ्यावा लागतो. जे जास्त कुपोषित असतात आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असते, त्या लोकांमध्ये क्षयरोगाचा धोका जास्त असतो. म्हणूनच उपचारादरम्यान आहार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. 

अशा लोकांनी अल्कोहोल, मांस आणि गोड पदार्थ जसे केक, पाव आदींपासून दूर राहायला हवे. त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन डी आणि आयर्नच्या सप्लिमेंटस् तसेच कडधान्यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. संतुलित आणि उत्तम आहार क्षयाच्या उपचारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतो. 

Back to top button