कोट्यधीश पानवाला सोन्याचे दागिने घालून विकतो पान! | पुढारी

कोट्यधीश पानवाला सोन्याचे दागिने घालून विकतो पान!

जयपूर : तुम्ही आतापर्यंत कधी ‘करोडपती पानवाला’ पाहिला आहे का? सध्या एक पानवाला खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये विशेष म्हणजे हा पानवाला कोट्यधीश आहे आणि त्यातच हा सोन्याचे दागिने घालून टपरीवर बसून पान विकतो. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. महत्त्वाचं म्हणजे या सोन्याचे दागिने घालणार्‍या पानवाल्याला बघायला दूर-दूरहून लोक येतात. हा पानवाला दोन कोटींचे दागिने अंगावर घालून पान विकतो. हा पानवाला पानाच्या टपरीच्या कमाईनेच इतका श्रीमंत झाला आहे की, तो आता कोट्यधीश आहे. राजस्थानमधील बिकानेर येथील या पानवाल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

या पानवाल्याच्या टपरीवरील पानांपेक्षा लोक या व्यक्तीला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी येथे येतात. या टपरीवरील पानांपेक्षा या व्यक्तीची सोशल मीडियावर जास्त चर्चा आहे. सुमारे दोन किलो वजनाचं सोनं घालून हा पानवाला पान विकतो. हा पानवाला सोन्याच्या अंगठ्या, हार, कानातले घालून पान विकतो. इतके दागिने घालून तो व्यक्ती आपली पानाची टपरी उघडतो आणि मग पान बनवून लोकांना खायला घालतो. या कोट्यधीश पानवाला पाहण्यासाठी दररोज लोकांची गर्दी जमते. राजस्थानच्या बिकानेरच्या सट्टा बाजारात असलेला हा ‘मुळसा फुलसा’ पान विक्रेता अतिशय प्रसिद्ध आहे. ‘मुळसा फुलसा’ पानाचं दुकान सुमारे 93 वर्षे जुनं आहे.

Back to top button