सवदी, नंदगावात ७०० जण क्वारंटाईन | पुढारी

सवदी, नंदगावात ७०० जण क्वारंटाईन

संबरगी : पुढारी वृत्तसेवा

सवदी, नंदगाव येथे कोरोनारुग्ण आढळल्याने दोन्ही गावांत रुग्णांच्या संपर्कात  आलेल्या 700 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे गावे ओसाड भासत आहेत. मात्र, अधिकार्‍यांच्या चुकीची शिक्षा गाव भोगत आहे, अशा प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त होत आहेत.

अथणी तालुका पन्नास दिवस कोरोनामुक्त होता. बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत होते. परंतु, 26 मे रोजी सवदी, नंदगाव, झुंजरवाड येथे कोरोनारुग्ण आढळल्याने अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली. क्वारंटाईनमधील काही लोक बाहेर गेले. ते जेथे जेथे गेले, ज्या लोकांशी संपर्क केला, त्या सगळ्यांचे  धाबे दणाणले आहेत. 

संबंधित बातम्या

झारखंडमधील सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळावरून परतलेल्या या क्वारंटाईन लोकांची भेट घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग किती जणांना झाला आहे, याचा  अंदाज करण कठीण बनले आहे. बलवाड, शिरहट्टी, नंदगाव, सवदी, कोकटनूर येथे 700 जणांना प्राथमिक शाळा, सरकारी माध्यमिक शाळा तसेच वसतिगृहांमध्ये  क्वारंटाईन करण्यात आले आहे.

क्वारंटाईन करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी यापूर्वी दक्षता घेतली असती, तर हा प्रसंग टळला असता. आता तालुका प्रशासन तळ ठोकून आहे. गावागावांत जागृती सुरू आहे. संपर्क रस्ते सर्व बंद करण्यात आले आहेत. शिवाय संशय येईल त्याला क्वारंटाईन केले जात आहे. अधिकार्‍यांच्या भीतीने अनेकजण गाव सोडून स्थलांतर करत आहेत. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. एस. कोपद, तहसीलदार दुंङाप्पा कोमर, डीवायएसपी एस. व्ही. गिरीश यांचे पथक तळ ठोकून आहे. स्वच्छता राखा, मास्क वापरा अशी जनजागृती ते करीत आहेत.

लॉकडाऊनमधून सवलत द्या : मेंढपाळांची मागणी

अंकली : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव जिल्ह्यातील मेंढपाळ प्रत्येकवर्षी मे महिन्याच्या अखेरीस कमी पावसाच्या प्रदेशाकडे जात असतात. यंदा कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने मेंढपाळांची अडचण झाली आहे. लॉकडाऊनमुळे बाहेरील जिल्ह्यात जाण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.   सध्या मेंढपाळ आहे त्या ठिकाणी अडकून पडल्यामुळे मेंढ्यांना चारा कमी पडू लागला आहे. वादळी पावसाचा फटका मेंढरांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मेंढपाळांना संचारबंदीतून मुक्त करा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात पाच लाखांवर धनगर समाजाची लोकसंख्या असून सुमारे एक लाखावर अधिक लोकांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. या लोकांची संपूर्ण उपजीविका मेंढीपालन व्यवसायावर अवलंबून असते. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या हवामानात मेंढरांच्या आरोग्यास अपायकारक असते. पावसाळा सुरू होताच सर्वत्र पिकांची पेरणी कामे सुरू होत असल्याने मेंढरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होतो.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेंढपाळ कमी पावसाच्या प्रदेशाकडे जात असतात. या भागात पावसाळ्यात मेंढरांना पोषक हवामान असते. शिवाय मेंढरांना चरण्यासाठी चाराही मुबलक प्रमाणात असतो. मेंढरांची वाढ चांगली होण्यासही मदत होते. यंदा मेंढपाळ लोकांसमोर कोरोनाचे संकट उभे असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

प्रत्येकवर्षी या दिवसात मेंढपाळांची स्थलांतरित होण्याची तयारी सुरू झालेली असते. यंदा शासनानेही अद्याप काही निर्णय जाहीर न केल्यामुळे मेंढपाळांमध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. सर्व बाबींचा विचार करून शासनाने मेंढपाळांची समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

Back to top button