स्त्री पुरुषांमध्ये ‘सेक्स’ची इच्छा जास्त असणे ही समस्या आहे का? | पुढारी

स्त्री पुरुषांमध्ये ‘सेक्स’ची इच्छा जास्त असणे ही समस्या आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क 

सेक्स (sex) हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. पण स्त्री आणि पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा जास्त असणे ही समस्या आहे का? याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

डॉ. राहुल पाटील म्हणाले की, सेक्स अति करू नये असे काहींच्या मनावर सतत बिंबवले जाते. त्याचा परिणाम असा होतो की सेक्स नेहमीपेक्षा थोडा जरी जास्त झाला की त्यांना वाटू लागते ‘आपली लैंगिक भूक इतकी कशी?’. आता असं स्त्रीला वाटले की ती स्वतःला ॲबनॉर्मल समजते. तसे काही पुरुषांना चांगले वाटते किंवा काहींना भीती वाटते ‘काही आजार तर नसेल ना?’ असा प्रश्न देखील पडतो. हे असे घडण्याचे कारण सेक्सला जास्त महत्व देऊ नये; अशी चुकीची माहिती सामान्य लोकांनी पसरवली आहे. म्हणून ५० नंतरचे स्त्री पुरुष सेक्स करतात असे समजले की त्यांची टिंगल केली जाते. आता या वयात कसले हे खूळ? असे टोमणेही मारले जातात. पण तसं काही नाही. सेक्स हा उत्तम व्यायाम आहे. मानसिक आणि शारीरिक सुखासाठी सेक्स गरजेचा आहे. वय, इच्छा जास्त असणे हे गैर नाही. काही मानसिक विकृतीमध्ये सेक्स वाढणे हा भाग वेगळा आहे. पण याचं प्रमाण कमी आहे.   

सेक्समुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो?

कांदा, लसूण खाल्यास ‘वीर्य’ वाढतं का?

विविध पोझिशन्समध्ये SEX करणे कितपत सुरक्षीत आहे?

मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का? याविषयी डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, साधारण हस्तमैथुन हे एकटेच आणि अविवाहित असताना करायचे असते असे समजले जाते. परंतु पार्टनर सोबत असताना देखील हस्तमैथुन किंवा एकमेकांचे हस्तमैथुन करून सेक्समधला आनंद मिळवता येतो. विवाहापूर्वी हस्तमैथुन केले की सेक्स जीवनात त्याचा उपयोग कामपूर्ती मिळवण्यासाठी खूप होत असतो. शरीरावरील कामुक केंद्रे दोघांना समजतात आणि कामपूर्ती, वासना वाढवण्यासाठी फायदा होतो. जे पूर्वी करत नाहीत त्यांना स्वतः वासना शमविण्यासाठी अडचणी येतात. हस्तमैथुनाबद्दल गैरसमज असलेले लोक जीवनात एकटे असतील तर सेक्स आणि हस्तमैथुनपासून वंचित राहतात. वासना शमवित नाहीत त्यामुळे चिडचिड वाढते, काहींना झोप येत नाही. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होऊ शकतो. हस्तमैथुनाचे फायदे आहेत. पण खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

हस्तमैथुनाने वीर्यनाश होतो का?

एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स अर्ध्या तासानं करावा?

Back to top button